जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटला; ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत;पूरपरिस्थिती कायम

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या 48 तासापासून संततधार थांबण्याचे नाव घेत नसून सर्वत्र नदी,नाले तुडूंब भरून वाहत असून नदी काठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला आहे.या भयंकर पूरपरिस्थिती उद्भवल्याने जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मागच्या दोन दिवसापासून एनडीआरएफ जवान तसेच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,सीईओ वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त सुनील लहाने,याच्यासह जिल्हाभरतील महत्वाचे अधिकारी व कर्मचारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आजघडीला नांदेड,माहूर व उमरी हे तीन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील नदी काठच्या गावांना धोका निर्माण झाला असून अशा 80 गावांतील संपर्क तुटला आहे.

यामध्ये अर्धापुर तालुक्यातील शेलगाव खु व बु,सांगवी,मेंढला,कौढा, भोगाव,देळूब,
मुदखेड तालुक्यातील पारडी, वैजापूर पारडी,मेंढका,कामळज,रोहिपिपलागावं,ईजली, खबाळा,पांगरगाव, बोरगावसिता, पिंपळगाव मगरे,
कंधार तालुका:-लाडका,चिखली,जाकापूर,धानोरा कौठा, राउतखेडा, गुंटूर, कंधारेवाडी, मानसिंगवाडी,गुंडा,दहीकळंबा
मुखेड तालुका:-चिचगाव,खतगाव,करणा,
देगलूर तालुका, तुपशेलगाव,सुगाव, बळेगाव, भोकरखेडा, ढोसणी,सांगवी क,लखा,
बिलोली तालुका:-आरळी,कौठा,लघुळ
नायगाव तालुका :-मुगाव,
धर्माबाद:-बनाली,
हदगाव तालुका:-वाकी मूनला,पाथरड,कँजारा, कौदूर,लोहा, शेदन,डाक्याचीवाडी, रालावाडा, आमनगाव,माळेगाव,
किनवट तालुका:-कोपरा,कँचली,शनिवारपेठ,आमडी, पिपलशेडा, पांगरपहाड, अंधबोरी,
भोकर तालुका:-दिवशी खु, नांदा बु,धारजनी,कोळगाव बु,लघलुद,
हिमायतनगर तालुक्यातील सर्वाधिक आठरा गावांचा संपर्क तुटला असून यामध्ये वाडगाव ज,घारापूर,एकांबा, कौठा ज,कौठा तांडा,मंगरूळ,कामारी, वाशी,अंदेगाव,जीरोना,पारवा खु,पोटा खु,पलसपूर,वारंग टाकली,डोलारी,शिरपल्ली,सिल्लोड,पिपरी तसेच लोहा तालुक्यातील धनज खु या अशा 80 गावांचा त्यात समावेश आहे.