कोविड-१९ प्रिकॉशन डोस सर्वत्र उपलब्ध;नागरिकांनी लस घ्यावी:-डीएचओ डॉ.शिंदे

नांदेड

नांदेड,बातमी.24;-सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत,उपकेंद्रात,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व नांदेड मनपा मिळणार मोफत प्रिकॉशन डोस ४१७ ठिकाणी सोय : जिल्ह्यात ११ लाख १३ हजार लाभार्थी अठरापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना सरकारी केंद्रावर कोविड १९ प्रतिबंधक लसीचा प्रिकॉशन डोस शुक्रवार १५ जुलैपासून मिळणार आहे. शहरातील महापालिकेची आरोग्य केंद्रे तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालयात लस देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक कोरोना प्रिकॉशन डोस देण्याच्या संबंधी सूचना देण्यात आल्या,अशी माहिती डीएचओ डॉ.बालाजी शिंदे यांनी दिली.

सध्या देशभरातच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १८ ते पुढील वयोगटातील नागरिकांनाही प्रिकॉशन डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनी प्रिकॉशन डोस घेण्याचा नियम होता. त्यात बदल करून हे अंतर सहा महिन्यांपर्यंत आले आहे. जिल्ह्यात प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या ही ११ लाख १३ हजार आहे.
प्रिकॉशन डोस घेण्यासाठी येताना नागिरकांनी दोन डोस घेतलेले सर्टिफिकेट व नोंदणीकृत मोबाईल सोबत आणावे. जिल्ह्यात प्रिकॉशन डोसचा पुरेसा साठा शिल्लक आहे. ऑनलाईन नोंदणी व थेट केंद्रावर येऊनही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता येईल. थेट केंद्रावरही मिळेल डोस जिल्ह्यातील नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार असून लसींचा साठा उपलब्ध आहे.
प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी त्या नागरिकाने दुसरा डोस घेऊन सहा महिने झाले का हे तपासले जाणार आहे. नागरिकांना प्रिकॉशन डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी तसेच थेट केंद्रावर येण्याचा पर्याय खुला असणार आहे. असे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केले आहे.