जातीअंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य:प्रकाश आंबेडकर धम्म मेळाव्याला हजारो लोकांची उपस्थिती

महाराष्ट्र

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून आहे.येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही,असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे शनिवार दि.5 रोजी आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात केले.

नांदेड येथील मोढा मैदान येथे दुपारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात हजारो बुद्ध अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक सोनवणे यांच्यासह अनेकांची व्यासपिठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशाला तोडू पाहत असून येथील माणसाची डोकी भडकवण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. मोहन भागवत हे हिंदू धर्माला वैदिक धर्माकडे घेऊन जात असून सनातनी मानसिकता घडवू पाहत आहे.भारताला आफगनिस्तानला जोडणे म्हणजे बॉम्बब्लास्ट संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न तर मोहन भागवत करत नसावे ना असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो,मात्र येथील भाजपच्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याच काम करावे,केवळ पायी चालून उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात आरक्षण वाचविण्याचे थोतांडा नाटक सुरू असून भाजपने कोर्टाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण खतम केले.आता पुढील पाच वर्षे तरी हे आरक्षण भेटलं असे वाटत.

आगामी काळात पैसे वाटून निवडणुका जिकणाऱ्या पुढाऱ्यांची व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय पर्याय नसून तोपर्यंत वंचीत समूहाची सत्ता येणार नसल्याचे आंबेकडर यांनी आवर्जून सांगितले. भाजपनं पामतेलात 45 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला,याची राहुल गांधी खडा सवाल केला,तर मोदी फळाफळा करायला लागतील,असे ही आंबेडकर यांनी सांगितले. भाजप सरकार हे सामान्यांचे नसून लुटारून असल्याचा घणाघात ही करायला ते विसरले नाहीत.राज्यातील शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीला येथील शेतकरीच जबाबदार असून शेतकऱ्यांनी जातीच्या सत्तेला महत्व दिल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं असून शेटजी आणि भटजी हे मुदामहून ऊस असो किंवा कापूस यास भाव देत नसल्याने कापूस व ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे,मात्र त्याच शेतकऱ्यांच्या भरवश्यावर इथेनॉलमधून कारखानदर गबाबर होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाला प्रतिकीवटल 3000 हजार भाव घ्यावा असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.