यापुढे सामाजिक न्याय विभाग स्वतः स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविणार:-सचिव सुमंत भांगे

महाराष्ट्र

मुंबई,बातमी24:-स्पर्धा परीक्षा करू इच्छित उमेदवारांचे भवितव्य घडविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबंध आहे. केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी काही संस्था स्पर्धा परीक्षा केंद्र चालवित असून यात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य घडण्याऐवजी काही संस्था ह्या सामाजिक न्याय विभागाकडे सोन्याच अंड देणारी कोंबडी म्हणून बघत आहेत. परिणामी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल नगण्य असेच आहेत. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य घडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने कंबर कसली असून यासाठी बार्टी स्वतः सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये स्वतंत्रपणे स्पर्धा परीक्षा केंद्र चालविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

नुकतीच बार्टी नियामक मंडळाची बैठक झाली. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा बाबत चर्चा झाली.यात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र स्वतः बार्टीमार्फत सामाजिक न्याय विभागाकडून चालविले जाणार असल्याबाबत ठराव घेण्यात आला.बार्टी मार्फत स्पर्धा परीक्षा केंद्र हे खाजगी संस्थेकडून अनुदान तत्वावर चालविली जातात.आशा संस्था निविदाप्रक्रियेत आहेत.परंतू या अशा संस्थांकडून दर्जा व गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरल्या आहेत.शासन भरीव अनुदान देत असतानाही उमेदरावांचे निकाल देण्यात अशा संस्था कुचकामी ठरल्याची बाब प्रकर्षांने शासनाच्या निदर्शनास आली आहे. या विषयी बार्टी नियामक मंडळाच्या बैठकीत जोरदार चर्चा झाल्याचे सुमंत भांगे यांनी सांगितले.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रवेश प्रक्रियाबाबत लवकरच सुरू होणार असल्याचे सांगत भांगे म्हणाले,की सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा यात प्रामुख्याने राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगापर्यंतच्या परिक्षेविषयी उत्तमात उत्तम दर्जा राखून ज्ञान कसे देता येईल,यावर भर असणार असून दिल्ली येथील यूपीएसी बाबत मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांशी करार करून उमेदवारांचे भवितव्य घडविले जाईल असे भांगे यांनी सांगितले. या बैठकीला बार्टी प्रमुख सुनील वारे,समाजकल्याण आयुक्त प्रशांत ननावरे,श्री.डिंगले यांच्यासह नियामक मंडळ सदस्य यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली.