नांदेड,बातमी24ः- गत वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये क्यार व महा या दोन चक्रीवादळांमुळे अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानी पोटी 51 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचे पुढील आठवडयात वितरण होणार आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार व महा या चक्रीवादळामुळे जिल्हयाच्या सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात खरीप व मोठया प्रमाणात रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा होता. याचाच परिणाम म्हणून नांदेड जिल्हयासाठी 50 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.
—–
चौकट
तालुकानिहाय अनुदान
नांदेड तालुक्यात 14 कोटी 28 लक्ष, अर्धापूर तालुक्यात 5 कोटी 59 लक्ष, मुदखेड तालुक्यात 3 कोटी 45 लक्ष, कंधार तालुक्यात 4 कोटी 66 लक्ष, लोहा तालुक्यात 8 कोटी 75 लक्ष, देगलूर तालुक्यात 6 कोटी 45 लक्ष, मुखेड तालुक्यात 4 कोटी 16 लक्ष, नायगाव तालुक्यात 3 कोटी, बिलोली 2 कोटी 35 लक्ष, धर्माबाद 1 कोटी 18 लक्ष, किनवट 2 कोटी 62 लक्ष, माहूर 1 कोटी 45 लक्ष, हिमायतनगर 2 कोटी 1 लक्ष, हदगाव 4 कोटी 28 लक्ष, भोकर 2 कोटी 41 लक्ष, उमरी 1 कोटी 83 लक्ष असे एकूण 50 कोटी 65 लक्ष रुपयांच्या अनुदानाचे शेतकर्यांना वाटप करण्यात येणार आहे.