गावच्या शाश्वत विकासासाठी कटिबंध रहा:- सीईओ मीनल करनवाल

नांदेड

नांदेड,बातमी24- गावच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावेत, असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिले आहेत.

ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड येथे सन 2024-25 या वर्षाचे ग्रामपंचायती विकास आराखडे तयार करणे बाबत जिल्हा परिषद खाते प्रमुख, जिल्हास्तरीय विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी तालुकास्तरीय विभागप्रमुख यांचे एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण रेखा काळम, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कार्यकारी अभियंता चितळे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी अधिकारी व्ही. आर. बेतीवार, उपजिल्हा कार्यक्रम अधिकारी नरेगा अमित राठोड आदींची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, ग्रामविकास आराखडा तयार करताना सर्वांगीण विकासांच्या योजनेचा समावेश करावा. ग्रामपंचायत सदस्य, गाव स्तरावरील विविध समित्या यांना एकत्रित घेऊन आराखडे तयार करावेत, असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते दीप प्रगतीत करून करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेत शासनाने दिलेल्या शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनानुसार तालुकास्तरीय विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले. या प्रशिक्षणा कार्यशाळेस राज्य शासनाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.