महामार्ग, राज्यमार्ग व इतर मार्गांवर उपोषण, धरणे, मोर्चे, रॅली आदी आयोजनावर निर्बंध:जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड

नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण मुद्दा तापला असून ठिकठिकाणी आंदोलन सुरु असल्याने दळणवळण यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.जिल्ह्यातील अनेक महामार्ग,राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गावर आंदोलन सुरू असून रस्त्यांवर टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

या सगळ्या परिणामाचा विचार करता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय, सर्व राज्य महामार्गावर व इतर सर्व मार्गांवर वाहतूक आवा-गमन सुरळीत चालू राहण्याच्यादृष्टीने नमूद ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील आदेशापर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास, आयोजित करण्यास प्रतिबंध केले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत.त्यामुळे