सीईओ मीनल करणवाल सादर करणार आपला पहिलाच अर्थसंकल्प,आज एक वाजता सभा

नांदेड

नांदेड,बातमी24; जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकास मान्यतेची बैठक मंगळवार दि. 5 मार्च रोजी होत असून सहा महिन्यांपूर्वी आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीईओ तथा प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या सीईओ ठरणार असून यापूर्वी सीईओ तथा प्रशासक म्हणून वर्षा ठाकूर-घुगे यांनी सलग दोन वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून घेण्यात येणाऱ्या योजनेचे सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चे मूळ अंदाज पत्रकास मान्यता देण्याबाबतची बैठक सोमवार 4 मार्च रोजी दुपारी 1.वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली होती. परंतु काही कारणास्तव ही सदर बैठक आता 5 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे होत आहे. असे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चना यांनी कळविले आहे.
या सुधारित अंदाजपत्रकात ग्रामीण भागातील नागरिकांना काय मिळणार आणि उत्पन्न वाढीबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे लोकांच्या नजरा असणार आहे.