जिल्हा परिषद सीईओ यांचे स्वीय सहाययक म्हणून नागमवाड रुजू

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मीनल करणवाल यांचे स्वीय सहाययक म्हणून बालाजी नागमवाड हे आजपासून रुजू झाले आहेत. अभय नलावडे यांची ए. बीडीओ म्हणून पदोन्नतीने मनरेगा नांदेड येथे बदली झाली. रिक्त झालेल्या स्वीय सहाययक या जागी नागमवाड हे कामकाज पाहणार आहेत.

बालाजी नागमवाड यांची 34 वर्षाची सेवा झाली असून त्यांनी यापूर्वी कृषी,सामान्य प्रशासन व 2001पासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहिले आहे.या पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले बालाजी नागमवाड यांचे आदेश आज काढण्यात आले. दांडगा जनसंपर्क व सौजन्याने सर्वांशी वागून काम करणारा स्वीय सहायक अशी नागमवाड यांची प्रतिमा आहे.