जिल्हाधिकार्यांचे उद्दिष्ट तिनशे मात्र 92 अटोपले
नांदेड, बातमी24ः- डॉक्टर्स डे च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले. किमान तिनशे जण रक्तदान करतील अशी अपेक्षा डॉ. इटनकर यांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात 92 जणांनी प्रतिसाद दिला. मात्र डॉ. इटनकर यांनी हे शिबिर आयोजित करून अधिकारी व कर्मचार्यांमध्ये उत्सहा आणण्याचे काम केले.
कोरोनाच्या नाजूक परिस्थितीत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा अचडणी पुढील काळात येऊ नयेत, यसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे अकरा वाजल्यापासून शिबिरास सुरुवात झाली. दिवसभराच्या काळात किमान अडीचशे ते तिनशे जण रक्तदान करतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु तो फ ौल ठरला. या आज असलेली आषाढी एकादशीची सुट्टी हे सुद्धा मुख्य कारण ठरले आहे.
या वेळीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह महसूल मधील सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी सहभाग घेत तब्बल 92 रक्ताच्या बॅग रक्तपेढीकडे सुपूर्द केल्या.