आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी पैशाची देवाणघेवाण करून उमेदवारी विकल्याचा आरोप समोर येत आहे,तसाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात घडला असून 48 वर्षे समाजकरणासाठी राजकारण करणाऱ्या सुरेशदादा गायकवाड यांची दावेदार भक्कम असताना काँग्रेसने येथे वाळूमाफिया असणाऱ्या एकास तिकीट दिले आहे.या उमेदवारीवरून आंबेडकरी चळवळीतील सामान्य माणूस नाराज झाला,असून कॉंग्रेसमधील जातीवादी नेत्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारी जाहीर ही करण्यात आलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या काळातील एकसंघ काँग्रेस आता दिसून येत नाही,दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांनी कशीबशी मोट बांधली,मात्र त्यांचे अकाली निधन झाले, येथे परिणामी काँग्रेसला कुणाचा पायपोस राहिला नसून, दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांचे महत्व व स्थान कवडीसमान राहिले आहे.ही परिस्थिती बऱ्याच वेळा माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी बोलून दाखविली,खरी मात्र स्वतःला उमेदवारी मिळावी,यासाठी त्यां सर्वांनी सोयीचं राजकारण केले.

आंबेडकरी चळवळीत ज्यांचे सर्वाधिक योगदान आहे,त्या सुरेश दादा गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत राज्यभर मोठं नाव आहे,शिवाय जिल्हाभर कार्यकर्ता जाळ आहे,सोबतच त्यांच्याकडे 4 विधानसभा व एक लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी असताना त्यांच्या उमेदवारीचा फायदा जिल्हाभर काँग्रेसला झाला असता,पंरतु येथे काँग्रेस नेत्यांनी घोडचूक करत चळवळीच्या नेत्यास उमेदवारी न देता बुद्ध समाजाचा चेहरा द्यायचा म्हणून एका वाळू माफियाला तिकीट देऊन स्वतः होऊन बुद्धिभेद केला आहे.या काँग्रेसच्या निर्णयाचा आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.

दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांनी सुरेशदादा गायकवाड यांना देगलूर-बिलोली राखीव मतदारसंघाचा शब्द दिला होता,मात्र तो शब्द त्यांचे पुत्र तथा नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढविणारे रवींद्र चव्हाण यांना पाळता आला नाही,हणमंत बेटमोगरेकर हे तर बैल भूमिकेत असतात,खतगावकर यांनी पाय आपटले,तितके ते हवेत उडतात,असे दिसून आले आहे.

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या कोलांटी उड्या पाहता,त्याचे राजकारण हे रंगबदलु सरड्या सारखे आहे. खतगावकर यांना सुनेच्या पुनर्वसनापलीकडे सगळं गौण आहे.त्या स्वार्थीपायी ते नायगाव येथील चव्हाण कुटूंबियांच्या शिरावर येऊन बसले,जिथे त्यांचे काहीच नाही, त्या ठिकाणी बिळ घुसखोरी केली. खतगावकर हे वैचारिक दृष्ट्या हे अत्यंत तकलादू असून ते धर्मनिरपेक्ष व धर्मांध विचार कधी स्वीकारतील याचा नेम नाही.मात्र ते अत्यंत कर्मठ असल्याने त्यांचे राजकारण हे सुरुवातीपासून आंबेडकरी चळवळीतीळ नेत्यांना मारक ठरलेले आहे.

या त्यांच्या कर्मठ राजकारणाने सुरेश दादा गायकवाड यांना उमेदवारीपासून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. बुद्ध उमेदवार द्यायचा तर तो पराभूत झाला पाहिजे,असाच राहावा,म्हणून काँग्रेसने वाळूमाफियाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालून भाजपला ही सीट बाय केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.ज्याच्या मागे चार लोक नाहीत,त्यास उमेदवारी जाहीर करून आंबेडकरवादी सुरेश दादा गायकवाड यांच्या चळवळीतील योगदानाचा अपमान जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केला, उलट सुरेश दादा गायकवाड यांना उमेदवारी झाली असती,तर काँग्रेसला जिल्हाभर लाभ होऊ शकला असता,शिवाय आंबेडकरी समाजात काँग्रेस सहजपणे पोहचू शकली असती.