थर्माकौलचा साठा मोठा जप्तःप्रशासनाची एकत्रित कारवाई

नांदेड

नांदेड, बातमी24ः-अवैध वाळू उपसा करण्यासाठी जे तराफे बनविले जात आहे. ते तराफे हे थर्माकौलपासून बनविले जात आहे. त्यामुळे महसूल, मनपा व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून थर्माकॉलचा साठा जप्त करून आला, असून संबंधित दुकानादारास दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार दि.1 जुलै रोजी करण्यात आली.

राज्य शासनाने यापूर्वीच थर्माकौल विक्रीवर बंदी असताना नांदेड शहरातील काही व्यापारी मंडळी अवैधपणे थर्माकौलची विक्री होत असल्याच्या कारणांवरून मारलेल्या छाप्यात इतवारा भागातील सराफा व नगरेश्वर मंदिरा मधील कपडा मार्केट मधील कपडा मार्केट मध्ये म युनूस म इस्माईल व एका जुन्या घरात तसेच इतवारा पोलीस स्टेशन जवळील मनपा मार्केट मधील मॉडर्न ट्रेडर्स या प्रतिष्ठानावर या पथकांनी धाडी टाकुन दोन प्रतिष्ठाणे सिल करण्यात आले व एका प्रतिष्ठाणास रू.5000/- दंड लावून त्याचे माल जप्त करण्यात आले.

ही कारवाई म.न.पा.चे सहा.आयुक्त गुलाम सादेख , डॉ.रईसोद्यिन ,महसुल विभागाचे नायब तहसिलदार मोगाजी काकडे व पोलिस उपनिरिक्षक काळे व इतर कर्मचारी व पोलिस यांच्या पथकाने केली.