कोरोनाच्या लढाईसाठी एक लाख मास्कची आमदाराकडून निर्मिती

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या लढाईत मुखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कोरोनाच्या महामारीत संकटात गरजूंना मदत आणि सेवा देण्याचे काम केले, हे काम इतक्यावरच न थांबविता मतदार संघातील लोकांसाठी एक लाख मास्क निर्मिती करून कोरोना योद्धा अशी भूमिका सक्षमपणे पार पडली.

मुखेड मतदारसंघातील मंजूर इतर बड्या शहरात मजुरीला जातात, अशा तेलंगणात गेलेल्या 1 हजार 760 मिरची तोड कामगाराना गावाकडे आणण्याचे काम केले.

मतदारसंघात कोरोना संसर्ग वाढू नये,यासाठी 50 खाटाचे रुग्णालय मजूर करून आणले. कामगारांची उपासमार होऊ नये,यासाठी 5000 हजराहुन अधिक किराणा किटचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात दररोज 1 क्विंटल तांदूळ खिचडी पोलीस कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी व सामान्य लोकांना वाटप अभियान नेटाने राबविले. तसेच उपजिल्हा रुग्णालयास 25 लक्ष रुपये आमदार स्थानिक निधीतून दिले.

डॉक्टर्स व नर्स मंडळींना रोज जेवण डब्बा वाटप केला,अशी अनेक कामे करून डॉ. तुषार राठोड यांनी मदतीचा हात गरीब-उपेक्षित लोकांना देऊन कोरोनाच्या लढाईत समर्पितपणे लढाई लढली,त्यामुळे कोरोनाच्या लढाईतील योद्धा ठरले