कोरोनाने घेतला आठरावा बळीः… येथील रुग्ण

ताज्या बातम्या

कोरोनाने घेतला आठरावा बळीः चौफ ाळा येथील रुग्ण

नांदेड, बातमी24ः- दिवसभराच्या काळात काळात सहा कोरोनाचे रुग्ण आढळले तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असला,तरी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चौफ ाळा येथील एक रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मरणारांची संख्या 18 झाली आहे.

मयत रुग्णाचे नाव हे शहनाज बेगम मस्तान अब्दुल असे आहे. मागच्या महिन्यात दि. 10 जुन रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. उपचारास प्रतिसाद न मिळू शकला नाही. यापूर्वी आलेल्या तपासण्याही कोरोना पॉझिटीव्ह आल्या होत्या. यातच गुरुवार दि. 2 जुलै रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत मरणारांची संख्या 18 झाली आहे. यात बारा रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये सहा महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे.