शनिवारी नांदेड,बिलोली देगलूरसह मुखेडममध्ये रुग्ण वाढले

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवार दि. 4 जुलैै रोजी कोरोनाचे नऊ रुग्ण वाढले आहेत. तर चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरेानामुक्त रुग्ण हे 310 तर एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 423 झाली आहे.

मागच्या दहा दिवसांच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 110 झाली आहे. दिवसाकाठी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत, असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही नव्वद टक्यांपेक्षा अधिक आहे. तसे असले, तरी रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. शनिवारी कोरोनाचे 9 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 434, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 310, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 95 इतकी आहे. तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील

पत्ता स्त्री/पुरुष वय
1)गणेश नगर——-स्त्री———-63

2)देगलुर———-पुरुष———57

3)आंबेडकर नगर—-पुरुष———-50

4)अशोक नगर—–पुरुष———–54

5)विष्णुपुरी——-महिला———-31

6) बिलोली——-महिला———-71

7) बिलोली——-पुरुष———–33

8) दापका(मुखेड)–पुरुष———–32

9)अंधोरी(अहमदपुर)-पुरुष———–49
——-