कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चारशे चाळीसः सकाळी ग्रामीण भागात सापडले तीन रुग्ण

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णांनी ग्रामीण भागात पाय पसरायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. सोमवार दि. 6 जुलै रोजी सकाळी आलेल्या अहवाल तिन्ही रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

रविवार दि. 5 जुलै रोजी कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू तर नवे 14 रुग्ण सापडले होते. परिणामी रुग्णांची संख्या 437 झाली होती.सोमवारी काही नमून्यांचा अहवाल आला.देगलूर, नायगाव व मुखेड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. यामध्ये नायगाव येथील बोमनाळे गल्ली येथे राहणारे 54 वर्षीय इसम कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. मुखेड येथील तागलेन गल्लीमधील 65 वर्षीय पुरुष तसेच देगलूर येथील नाथनगर येथे राहणारा 35 वर्षीय एकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 440 झाली आहे. आतापर्यंत 321,विविध कोविड केअर सेंटर येथे 99 रुग्ण उपचार घेत आहेत. तर वीस जणांचा या संसर्गामुळे मृत्यू ओढावला आहे.