आमदार मोहन हंबर्डे दहा दिवसांच्या उपचारानंतर नांदेडात दाखल

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः- नांदेड दक्षीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाची लागण झाली होती. औरंगाबाद येथे उपचार घेऊन ते नांदेड येथे सोमवार दि. 6 जुलै रोजी परतले.

मागच्या महिन्यात दि. 26 जून रोजी आमदार मोहन हंबर्डे यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यासह कुटुंबातील दहा सदस्यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली होती. नांदेड येथे एक दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते कुटुंबासह औरंगाबाद येथील एका बडया खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. दहा दिवसांच्या काळात कोरोनाची लक्षणे तपासणीअंती आढळून आली नाहीत. त्यामुळे मोहन हंबर्डे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला.
—–
नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी मुंबईत उपचार घेऊन कोरोनावर मात केली. त्यानंतर आमदार मोहन हंबर्डे यांना सुद्धा कोरोना झाला. ते सोमवारी या संसर्गातून मुक्त झाले. याच दिवशी उपमहापौराचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तसेच एक माजी महापौर, नगरसेवक व माजी नगरसेवक यांना ही कोरेानाचा संसर्ग झाला.