कोरोनाने घेतला 21वा बळी

नांदेड

नांदेड, बातमी24ः-कोरोनाचे रुग्ण ज्याप्रमाणे वाढत आहेत. तसेच दोन ते चार दिवसांआड कोरोनामुळेही होत आहेत. मंगळवार दि. 7 जुलै रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे एका 83 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 21 झाली आहे. यापूर्वी रविवारी एकाच दिवशी दोन कोरोनाचे रुग्ण दगावले होते.

कोरोनाचे आकड्याचे मिटर जोरात पळत असून रोजमितीस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू होत आहे. रविवारी दिवसभरात 14 तर सोमवारी 21 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. यात वयस्क रुग्णांची संख्या तरुणांप्रमाणे सारखी आहे. यात सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या इतवारा भागातील 83 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आलेे.

सूचनाः यासंबंधी सविस्तर वृत्त काही वेळात