दिवसभरात कोरोनाचा दुसरा बळी

नांदेड

नांदेड,बातमी24ः-लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला,तरी कोरोनाने मंगळवार दि. 7 जुलै रोजी दुपारपर्यंत दुसरा बळी घेतला आहे. सकाळी इतवारा भागातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता, तर दुपारी बळीरामपुर येथील 60 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे दिवसभरात दोन आणि आतापर्यंत कोरोनाचा जिल्ह्यात 22 वा बळी ठरला आहे.

रविवारी एकाच दिवशी कोरोनामुळे दोघे जण दगावले होते. त्यानंतर सोमवारचा दिवस खाली गेल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास इतवारा भागातील 83 वर्षीय एका वृद्धाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली, तसे कळविण्यात आले होते. तर दुपारी नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथे राहणार्‍या 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. या मयत इसमाचा स्ॅवब सोमवारी पॉझिटीव्ह आला होता.