नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या वाढती रुग्णांची संख्या तोडण्यासाठी कोरोना ब्रेक द चैन ही संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुरु केली. यासाठी पोलिस व मनपाचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी प्रत्येक दुकानावर जाऊन पाहणी केली जात आहे. तसेच चेहर्यावर मास्क न वापर्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.
कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आकडा पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत होती.मात्र डॉ. इटनकर यांनी व्यापार्यांशी साधलेल्या संवादानंतर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.परंतु आवश्यकता पडल्यास निश्चित निर्णय घेतला जाईल, असे डॉ. इटनकर यांनी सांगितले. त्यानुसार बुधवार दि. 8 जुलैपासून महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे.
महापालिकेच्या तरोडा, वर्कशॉप, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा व सिडको झोनच्या प्रत्येकी पाच अधिकारी-कर्मचार्यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाकडून आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे.नियमांचे पालन न करणार्यांवर दंड लावला जात आहे. तसेच पोलिसांकडून दुचाकीवर डब्बल सिट असल्यास पाचशे रुपये, तिनचाकी चालक व दोन या व्यतरिक्त एक हजार रुपये व चाकीचाकी वाहनाच्या संदर्भात असाच नियम लावण्यात आला आहे.