त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्लाचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय येथील महात्मा फुले येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले राजगृह जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणाकेंद्र आहे. राजगृहावरील हल्ला आंबेडकरी समाजावरील हल्ला असून असे हल्ले आंबेडकरी समाज कदापीही सहन करणार नाही,त्यामुळे या घटनेचा निषेध करावा तितका कमी असे प्रशांत इंगोले म्हणाले.

या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले,असून दोषी आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे इंजि.प्रशांत इंगोले यांनी केली.

या धरणे आंदोलनात प्रशांत इंगोले,प्रा.साहेबराव बेळगे, आयुब खान,कमलेश चौदनते, केशव कांबळे, प्रमिला वाघमारे, रूपक जोंधळे, अविनाश नाईक, डॉ.संतोष वाठोरे, डॉ.संघरत्न कुरहे, पद्माकर सोनकांबळे,के.एच. वनने, डॉ. विलास भद्रे, प्रियानंद घोडके, डॉ.राजेश पंडित,वैजनाथ गिरी, डॉ.बळीराम वाघमारे,संजय गायकवाड,भाऊराव भदरगे, राजेश रापते,यशवंत चावरे,रामचंद्र सातव,मुकुंद चावरे,विजय कांबळे,दीपक कसबे,दीपक जोंधळे आदींची उपस्थिती होती.