9 रुग्ण घरी परतले;तिघांची प्रकृती गंभीर; बातमीचा अंदाज तंतोतंत..

नांदेड

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोना साखळी तोडणार हे वृत्त बातमी24.कॉम ने प्रकाशित केले होते,हे वृत्त खरे ठरले आहे. नांदेड जिल्ह्यात आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.विशेष म्हणजे 9 रुग्ण बरे झाले तर 3 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

जिल्ह्यातील 98 पैकी चार अहवाल अनिर्णित आले तर 94 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी 22 अहवाल पॉझिटिव्ह आले होते.त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 256 इतकी झाली आहे. तर पंजाब भवन यात्री निवास येथील 6, शासकीय 2 रुग्ण व माहूर येथील एक असे नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 177 तर उपचार घेत असलेले रुग्ण हे 66 आहेत.
——-
तीन रुग्णांची प्रकृती गंभीर
नांदेड जिल्ह्यात तीन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, यामध्ये एक महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे.एक महिला तिचे वय.52 व पुरुषांचे वय हे 52 व 54 असे आहे.
——–
कोरोनाच्या रुग्ण संख्या:-256
कोरोनामुक्त रुग्ण संख्या:-177
उपचार घेत असलेले रुग्ण:-66
आतापर्यंत मृत रुग्ण संख्या:-13