अबब…नांदेडचे खासदार ही असुरक्षित;10 कोटी द्या अन्यथा जीवे मारू;सात महिन्यांपूर्वीची  धमकी निवेदनामुळे समोर

नांदेड, बातमी24:-संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरातील वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सात महिन्यांपूर्वी दहा कोटी रुपये दे अन्यथा सर्व कुटूंबाला मारून टाकू असे धमकी पत्र आल्याची माहिती आज समोर आली.या जुन्या धमकीच्या पत्राने आज नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदेडचे खासदर ही सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये पुन्हा सापडले चार पिस्टल;पाच जण ताब्यात

नांदेड, बातमी24:- दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत,चार पिस्टल,दोन काडतुस व इतर घातक शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई मंगळवार दि.19 रोजी रात्री करण्यात आली.नांदेड येथे संजय बियाणी हत्येनंतर पोलीस अलर्ट झाली असून धाडस्त्र व कारवाई सुरूच आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मनीष उर्फ मन्या पिता अशोक कांबळे (वय.32), दक्षक […]

आणखी वाचा..

संजय बियाणी हत्या प्रकरणी भाजपची जोरदार निदर्शने; खासदार चिखलीकर यांचा पोलिसांवर हल्लाबोल

नांदेड, बातमी24:- नांदेड येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेस पंधरा दिवस उलटले, तरी पोलीस या प्रकरणाचा अद्याप तपास लावू शकले नाहीत.या निषेधार्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दि.20 रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पोलीस प्रशासनाचा खरपूस समाचार घेत त्यांचे वाभाडे […]

आणखी वाचा..

गिन्नी माही यांच्या भीम गीतांनी जिंकली नांदेडकरांची मने संविधान हीच देशाची ताकद – प्रा. जोगेंद्र कवाडे

नांदेड,बातमी24:-रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवात पंजाबी गायिका गिन्नी माही यांनी पहाडी आवाज भीम गीते गाऊन आंबेडकरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण केल्याने एकच जल्लोष बघायला मिळाला. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी संविधान हीच देशाची ताकद असून संविधानामुळे देश टिकून राहील, त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे […]

आणखी वाचा..

मनपाचा रौप्य महोत्सव देणार नांदेडकरांना सांस्कृतिक मेजनवानी:-महापौर जयश्री पावडे

नांदेड, बातमी विशेषतः नांदेड-वाघाला महानगरपालिकेस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्षे साजरे करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला असून या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकर नागरिकांना बघायला मिळणार असल्याची माहिती महापौर जयश्री निलेश पावडे यांनी दिली. यावेळी बोलताना जयश्री पावडे म्हणाल्या,की नांदेड शहराच्या विकासाची पायाभरणी कै. शंकरराव चव्हाण यांनी केली तर पुढील […]

आणखी वाचा..

भीम महोत्सवात पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या गीतांचे आयोजन;मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – बापूराव गजभारे

नांदेड,बातमी:- बी.आर. आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने सर्वपक्षीय भीम महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीची आंबेडकरी गायिका गिन्नी माही (पंजाब) यांच्या भीमगितांचा कार्यक्रम तसेच कृष्णाई पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे होणार असून या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक बापूराव गजभारे व स्वागताध्यक्ष पंढरीनाथ […]

आणखी वाचा..

त्या व्हिडिओने सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांची सुद्धा झोप उडावली

नांदेड,बातमी विशेष:- उधोजक तथा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या गोळ्या झाडून करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र कालपासून फिरत आहे.हा व्हिडिओ पासून माझी सुद्धा रात्रभर झोप उडाली.मी सुद्धा रात्रभर झोपू शकलो नसल्याची कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मंगळवार दि.5 रोजी संजय बियाणी यांची गोळया झाडून त्यांच्या राहत्या […]

आणखी वाचा..

मंत्री चव्हाण यांचा इशारा तर खा.चिखलीकर यांची रस्त्यावर उतरण्याची भूमिका संजय बियाणी हत्याकांडानंतर राजकारण तापले

नांदेड, बातमी विशेष:- प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची काल दिवसाढवल्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा एकच खळबळ उडाली होती.या घटनेच्या पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तात्काळ नांदेड गाठून मयत संजय बियाणी कुटूंबियांची सांत्वन केले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संजय बियाणी यांची अंत्ययात्रा निघाली.या अंत्ययात्रेत […]

आणखी वाचा..

प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांचा गोळीबारात मृत्यू

नांदेड,विशेष वृत्त:- नांदेड शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा उपचारादरम्यान झाला,या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड शहरात मागच्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात गँगवार,खंडणीराज,व गोळीबार रोखण्यात पोलिसांना आलेले अपयश आहे.त्यामुळे नांदेड शहरात सतत गोळीबार,खून आणि गँगवॉर घडत आहेत. आनंद नगर जवळील नाईक नगर येथिल त्यांच्या घराच्या […]

आणखी वाचा..

प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार;प्रकृती गंभीर

नांदेड,विशेष वृत्त:- नांदेड शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार झाला,असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.त्यांच्यावर शहरातील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. आनंद नगर जवळील नाईक नगर येथिल त्यांच्या घराच्या गेटजवळ दोन अज्ञात इसमानी बियाणी यांच्यावर गोळीबार केला.यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी अकरा वाजता सुमारास घडली.या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शहरात […]

आणखी वाचा..