925 शिक्षकांना चटोपाध्‍याय वरिष्‍ठ श्रेणी;सीईओ वर्षा ठाकूर यांचा महत्वपूर्ण निर्णय

    नांदेड,बातमी24- नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने आज जिल्‍हा परिषद शाळातील 925 शिक्षकांना चटोपाध्‍याय वरिष्‍ठ श्रेणी प्रदान करण्‍यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हे आदेश प्रदान केले आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर […]

आणखी वाचा..

लाच घेतल्या प्रकरणी दोन कर्मचारी ताब्यात

नांदेड,बातमी24:-मुखेड पंचायत समिती येथील दोन कर्मचारी लाचेच्या प्रकरणात अडकले आहेत. ही कारवाई नांदेड येथे करण्यात आली.मागच्या पाच दिवसात जिल्हा परिषदेचे तीन कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले,की तक्रारदाराकडून कालबद्ध पदोन्नतीमधील मंजूर झालेल्या रक्कमेचा बिल मुखेड पंचायत समितीकडून पास करून देण्यासाठी आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र […]

आणखी वाचा..

किन्नरांच्या पुनर्वसनाचा नांदेड पॅटर्न ;प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम:-अशोक चव्हाण  

नांदेड,  विशेष :-  भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हामी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यातला राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. […]

आणखी वाचा..

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

नांदेड,मुंबई:- राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कम्पनीचे खासगीकरण होऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील माझ्या दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू आपण माझ्या विनंतीला मान देऊन प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे कळकळीचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना […]

आणखी वाचा..

जल जीवन मिशन अंतर्गत एकाच दिवशी 75 किलोमिटर पाईप लाईन;पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, विशेष प्रतिनिधी:- आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्‍त नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्‍या वतीने एका दिवसात नांदेड जिल्ह्यातील 15 गावांमधून जल जीवन मिशन अंतर्गत 75 किलोमीटर पाईप लेयींग करण्‍याच्‍या विषेश मोहिमेचा शुभारंभ राज्‍याचे सार्वजिक बांधकाम मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्‍हाण यांच्‍याहस्‍ते आज शनिवार दिनांक 26 मार्च रोजी करण्‍यात आला. यावेळी खासदार, […]

आणखी वाचा..

सात हजाराची लाच घेणारा कृषी अधिकारी जाळयात

नांदेड,बातमी24:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबन योजनेचे मंजूर अनुदानाची रक्कम लाभार्थी यांना देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या माहूर येथील कृषी अधिकाऱ्यास एसीबीने अटक केली.ही कारवाई माहूर येथे गुरुवार दि.24 रोजी करण्यात आली. किनवट येथील पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा माहूर येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार सांभाळणारे आरोपी संजय एकनाथ घुमटकर याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी […]

आणखी वाचा..

जाती-जमातीच्या योजना अंमलबजावणी  बदल समिती अध्यक्षांकडून जिल्हाधिकारी-सीईओची प्रशंस

नांदेड,विशेष प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात या अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली.त्यामुळे सामान्य लाभार्थी यांना या योजनांचा लाभू मिळू शकला.या बदल अनुसूचित जाती-जमाती आयोग अध्यक्ष ज.मा. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गुरुवार […]

आणखी वाचा..

सीईओच्या निर्णयामुळे माजी पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांना दिलासा;नवी जबाबदारी सोपविली जाणार

नांदेड, बातमी24:- प्रशासक काळात पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहाय्यक राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जबाबदारीने आहे,तिथे राहून प्रशासकीय काम करण्याचे आदेश दिले.सीईओ ठाकूर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासक काळात पदाधिकारी यांच्याकडे काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहणार […]

आणखी वाचा..

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कार्यालयात डाबण्याचा प्रयत्न;गुन्हा नों

नांदेड,बातमी24:- उप अभियंत्यास पदभार कसा काय देत नाहीत,यावरून मुदखेड येथील एका कार्यकर्त्याने चक्क नांदेड जिल्हा परिषद दक्षिण बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीला यांना त्यांच्याच दालनात कोडण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी नीला यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दक्षिण बांधकाम विभागातील उपअभियंत्यास चार्ज देण्यात यावा,यासाठी मुदखेड येथील मारोती बिचेवार कार्यालयांत येऊन […]

आणखी वाचा..

होट्टल महोत्सवातून मिळणार सांस्कृतिक मेजवानी;9 ते 11 एप्रिल  आयोजन;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- कोरोना नंतर दोन वर्षांनी होणारा तसेच सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या “ होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे ” आयोजन 9 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी […]

आणखी वाचा..