अंतापूरकर उधा उमेदवारी अर्ज दाखल करणार;काँग्रेसची होणार सभा

नांदेड,बातमी24:-देगलूर,बिलोली विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जितेश अंतापूरकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेस पक्षानी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जितेश अंतापूरकर उद्या दि.7 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने पालकमंत्री अशोकराव चव्हाण व महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना […]

आणखी वाचा..

वंचितची उमेदवारी डॉ.इंगोले यांना जाहीर;वंचीतचा हमखास होणार:-फारुख अहेमद

  नांदेड,बातमी24:-वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोट निवडणूकीचे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार म्हणून डॉ. उत्तम इंगोले यांना जाहीर करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली.ही निवडणूक विजयासाठी लढणार असल्याची माहिती वंचीत बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते […]

आणखी वाचा..

काँग्रेसमधील बंड थंड;क्षीरसागर-कदम यांच्या पाठींबा

नांदेड,बातमी24:- देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून काँग्रेस नेते भीमराव क्षीरसागर व मंगेश कदम यांनी निवडणूक मैदानात उतरण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.मात्र काँग्रेस पक्षाकडून स्व. रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. क्षीरसागर व कदम या काँग्रेस नेत्यांनी जितेश अंतापूरकर यांना पाठींबा दिला. या संबंधीचे कदम,क्षीरसागर व जितेश अंतापूरकर यांचे छायाचित्र […]

आणखी वाचा..

मा.आमदार साबणे यांचा रडत पडत शिवसेनेला पूर्णविराम; भाजपच तिकीट जाहीर

नांदेड, बातमी24:-शिवसेनेकडून दोन वेळा आमदारकी भोगणाऱ्या माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेचा त्याग केला.यावेळी त्यांनी शिवसेना सोडताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवित शिवसेना पक्ष अशोक चव्हाण यांनी संपविल्याची टीका केली. यावेळी त्यांनी ढसा ढसा रडत सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळविल्या. आज भाजपच्या केंद्रीय समितीने साबणे यांची उमेदवारी जाहीर केली,तर ते उधा अधिकृतपणे भाजप […]

आणखी वाचा..

नांदेड महापौर मोहिनी येवनकर यांचा राजीनामा

नांदेड, बातमी24:- नांदेड वाघाला महानगरपालिका महापौर मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिला आहे.पुढील महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पदाच्या शर्यतीत जयश्री पावडे यांचे स्थान अग्रस्थानी आहे. नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसचे बलाढ्य बहुमत आहे.त्यानुसार सव्वा वर्षे याप्रमाणे महापौर सूत्र ठरले सन 2017 पासून आतापर्यंत राजीनामा देणाऱ्या मोहिनी येवनकर या तिसऱ्या महापौर ठरल्या असून यापूर्वी […]

आणखी वाचा..

देगलूर पाेट निवडणुकीत काेविड लसीकरण दोन डाेस आवश्यक :-जिल्हाधिकारी इटनकर

नांदेड,बातमी24:-९० देगलूर-बिलाेली विधानसभा पाेट निवडणुक प्रक्रियेत, सामील उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांचे काेविड लसीकरण (दोन वेळा) असणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नवरात्र, दसरा, दिपावली सणांच्या उत्सव प्रसंगी पाेटनिवडणूक असली तरी काेविड नियम आणि निवडणूक आदर्श आचारसंहिता याचे एकत्रित पालन सर्वांना करावे लागणार आहे . दि. १५ जानेवारी […]

आणखी वाचा..

नांदेड-नागपूर बस पुराच्या पाण्यात गेली वाहून;उमरखेडजवळील घटना

नांदेड, बातमी24: नांदेड ते नागपूर ही बस उमरखेड जवळील दहागाव येथील नाल्याच्या पुलावरून वाहून गेल्याची घटना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.या बसमध्ये एकूण दहा प्रवासी होते.यातील काहींचे प्राण वाचले तर काही जण वाहून गेल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. नागपूर आगाराची बस एम एच 14 बी टी 7018 नांदेड येथून पहाटे पाच वाजता निघाली,हदगाव,उमरखेड मार्गे नागपूरकडे […]

आणखी वाचा..

आ. कल्याणकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर -अवजारे वाटप

नांदेड,बातमी24 :- अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना पिक विमा पोहोचावा यासाठी आम्ही आग्रही असून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केले. राज्य शासनाच्या कृषी  यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल वरील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने वडवणा येथे ट्रॅक्टर व कृषी अवजारे वाटपाचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. […]

आणखी वाचा..

माहूर गडावरील ‘रोप वे’ ला गती ! राज्य शासन व ‘वॅपकॉस’मध्ये करार

नांदेड,बातमी24 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर ‘रोप वे’ उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’ मध्ये करार झाला आहे. यामुळे  माहूरगडच्या विकासकामांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि ‘वॅपकॉस’चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या […]

आणखी वाचा..

पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस;वयाच्या 26 व्या वर्षी सुमितकुमार धोत्रे यांचे पहिल्या प्रयत्नात यश

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- केंद्रीय लोकसेवा सेवा आयोगाचा अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.24 रोजी जाहीर झाला आहे.यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटूंबातील सुमितकुमार धोत्रे याने पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमितकुमार याने वयाच्या 26 व्या वर्षी इतके मोठे यश संपादन केले.सुमितकुमार याचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका […]

आणखी वाचा..