वादग्रस्त प्र.कार्यकारी अभियंता बारगळचा उदोउदो करणारे तोंडघशी!

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात वादग्रस्त समाज कल्याण अधिकारी राहिलेल्या सुनील खमीतकर यांच्या बेशरम कारभाराला संपूर्ण जिल्हा वैतागला होता.तसेच पाणी पुरवठा विभागात प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर राहिलेल्या बारगळ यांच्या वादग्रस्त कारभाराने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही वैतागलेले असताना जिल्हा परिषद मधील काही पदाधिकारी आणि मोजक्या अधिकाऱ्यांनी बारगळ यांचा केलेला उदोउदो हा त्यांनाच तोंडघशी पडणारा ठरला […]

आणखी वाचा..

पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :-प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात पेट्रोल,डिझेल गॅस भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा

  नांदेड,बातमी24:-अच्छे दिनचे स्वप्न दाखवीत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे भाव भरमसाठ वाढविले आहेत. पेट्रोल ने शंभरी पार करून दीडशे कडे वाटचाल सुरू केले आहे तर डिझेल शंभरी गाठत आहे .घरगुती गॅसच्या किमती अस्मानाला पोहोचल्या आहेत. यामुळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशावर लादलेल्या या महागाईचा एक दिवस विस्फोट होऊन यामध्ये […]

आणखी वाचा..

अतिवृष्टी नुकसानीची शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीस तात्काळ माहिती कळवावी – जिल्‍हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:-मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्‍या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्‍ये कळवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्‍यास, भुस्‍खलन, गारपीट, ढगफुटी […]

आणखी वाचा..

भुयारी पुलाखाली साचणारे पाणी ठरतेय डोकेदुखी;आयुक्त लहाने,नगरसेवक गजभारे यांनी केली पाहणी

नांदेड, बातमी24:-पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला,की हिंगोली गेट भुयारी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते,त्यामुळे वाहतूक पुर्णपणे बंद राहते. या हिंगोली गेट येथील भुयारी पुलाची पाहणी मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने व नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केली. यावेळी पाण्याचा निचरा व्हावा,यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावी,अशी मागणी या भागाचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सुनील […]

आणखी वाचा..

डॉ.शंकरराव चव्हाण जयंती निमित्त मधुकर भावे, राजीव खांडेकर यांचे व्याख्यान

नांदेड,बातमी24-भारताचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकार्‍यांचा सत्कार व परिसंवादाचे आयोजन दि.14 जुलै रोजी  करण्यात आले आहे. येथील कुसूम सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार असून मान्यवरांचा सत्कार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात येणार […]

आणखी वाचा..

काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के;नागरिकांनी घाबरू नये:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:- आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मालेगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.तसेच छत्रपती चौक,फरांदे नगर,गोदावरी नगर, मालेगाव रोड, स्नेह नगर पोलीस कॉलनी, हनुमानपेठ (वजीराबाद) मध्ये सौम्य […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकरी डॉ.इटनकर केली शेतात पेरणी;टिपिकल शेतकरी लूक

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- आपल्या ध्येय धोरणावर निश्चित राहून लोक सेवेत सतत कार्यमग्न राहणारे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाचे संकट कमी होताच डॉ.इटनकर यांनी खरिपाकडे मोर्चा वळविला,त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आणि शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी डॉ.इटनकर हे शेतीवर पोहचले, तेही चक्क अगदी शेतकरी वेशभूष करून होय.यावेळी त्यांनी […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा खंडपीठात कायम

औरंगाबाद,बातमी24:- ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरुन ११वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा न्या. श्रीकांत कुलकर्णी आणि न्या.व्ही.के.जाधव यांच्या खंडपीठाने कायम केली आहे. तुळशीराम बालाजी पुप्पलवाड(३५) रा.पाटोदा ता.नायगाव जिल्हा नांदेड असे आरोपीचे नाव आहे. २०१०साली पाटोदा गावात १५डिसेंबर रोजी दुपारी एक वा. शंकर वेंकट पुप्पलवाड याचा आरोपी तुळशीरामने चाकूने सपासप वार करुन खून केला होता. सप्टेंबर २०१०मधे […]

आणखी वाचा..

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे ‘ते’ आरोपी जेरबंद;एलसीबी ची कारवाई

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील जबरी चोरीमधील पाच आरोपींना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.या आरोपींनी बिलोली,देगलूर,मुखेड,लिंबगाव व नांदेड ग्रामीण हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय पांडुरंग भारती यांच्या पथकाने केली. मे महिन्यातील 10 रोजी दिलीप पेट्रोल पंपवरील कर्मचारी हा जमा रक्कम 8 लाख 43 हजार रुपये घेऊन […]

आणखी वाचा..