नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार;मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

  नांदेड,बातमी24:-पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाडा विभागाची तूट भरून काढण्याची योजना कालबद्धपणे पूर्ण निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थास्थानी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, […]

आणखी वाचा..

दिलीप पा. बेटमोगरेकर यांचा पदावर नसताना ही वकुब कायम

नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर छाप पडणारे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा वकुब पदावर नसतानाही कायम आहे.निमित्त होत त्यांच्या वाढदिवसाचे होय. सन 2012 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या दिलीप पाटील बेटमोगरेकर यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. अशोक चव्हाण यांनी दिलेल्या […]

आणखी वाचा..

राष्‍ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धा; स्‍पर्धकांनी सहभाग घ्‍यावा- सीईओ ठाकूर

  नांदेड,बातमी24:- ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृतमहोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. […]

आणखी वाचा..

पालकमंत्री चव्हाण यांच्या पुढाकाराने देगलूर विधानसभा मतदारसंघात २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

नांदेड, बातमी24:-देगलूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी कंबर कसली असून, नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल २०८ कोटी रुपयांची ३२ विकासकामे मंजूर करण्यात आली. पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील कामांमध्ये राज्य मार्गांच्या सुधारणेची २८ कोटी ७५ लाख […]

आणखी वाचा..

थोरवटे, हत्तींअबीरे, मदनूरकरसह तलवारे यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषद कर्मचारी युनियन(ओंकार प्रणित) ४३४० बैठक कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सहसचिव देवेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  घेण्यात आली. यामध्ये  जिल्हा अध्यक्ष पदी प्रल्हाद मुकुंदराव थोरवटे तर जिल्हा सचिव पदी सिध्दार्थ हत्तीअंबिरे व कार्याध्यक्ष पदी राघवेंद्र मदनुरकर आणि कोषाध्यक्ष पदी प्रेमानंद उर्फ पवन तलवारे अशी जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. बच्यासह खालीलप्रमाणे […]

आणखी वाचा..

बारगळचा बाष्कळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; सरपंचाने केली संचिकेची होळी

नांदेड,बातमी24:-ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून शेकडो करनाम्याचा कळस रचणाऱ्या बारगळ यांच्या बाष्कळ कारभाराचे पितळ एका सरपंचाने जनतेसमोर आणले आहे. तीन महिन्यापूर्वी सादर केलेल्या नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई आराखड्यांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱयांच्या बेजबाबदार पणामुळे पावसाळा लागला तरी कार्यारंभ आदेश पारित केले नाही. संतापलेल्या किनवट तालुक्यातील घोटी ग्रा प […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांची वाढली डोकेदुखी!

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कामकाज कार्यपद्धती ही गतिमान राहिली आहे.मात्र मागच्या काही दिवसांमध्ये विभाग प्रमुखांची रिक्त पदे गतिमान कारभाराला मारक ठरत असल्याने सीईओ वर्षा ठाकूर यांना कामकाज चालवित असताना डोकेदुखी ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीत आहे त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या कारभार चालवावा लागत आहे. नांदेड जिल्हा परिषदमध्ये तब्बल आठरा विभाग […]

आणखी वाचा..

शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात गळफास;लोहा येथील घटना

नांदेड,बातमी24:-लोहा तहसील कार्यालयाच्या इमारतींवर उमरा येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.3 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. लोहा तालुक्यातील उमरा येथील 43 वर्षीय शेतकरी भीमराव चंपती सिरसाठ हे मागच्या काही दिवसांपासून कर्जबाजारी झाल्याने हतबल होते. यातून भीमराव सिरसाट यांनी तहसील कार्यालय इमारतीवर जाऊन गळफास लावून घेत जीवन […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केली प्रस्तावित रुग्णालय जागेची पाहणी

नांदेड,बातमी24:- नांदेड उत्तर शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या शंभर खाटाच्या प्रस्तावित रुग्णालय जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केली. जागेच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी डॉ.विपीन इटनकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. नांदेड शहर व नांदेड तालुका ग्रामीण भागाची लोकसंख्या विचारात घेता, ग्रामीण भागात शंभर खातांचे रुग्णालय ग्रामीण भागाशी जोडले जावे,अशी […]

आणखी वाचा..

शेतकऱ्यांनी न खचून जाता आधुनिकतेची सांगड घालत शेती करावी:-जि.प.अध्यक्ष अंबुलगेकर

नांदेड,बातमी24:-शेती ही निसर्गावर अवलंबून असल्‍यामुळे शेतक-यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता संघर्ष करावा. आत्‍महत्‍या करणे हा पर्याय नसून शेतक-यांनी नव्‍या उमेदीने शेतीकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. शेतक-यांनी धावणारे पाणी आडवावे व अडवलेले पाणी जमिनीत मुरवून शेती फुलवावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. कृषी विभाग […]

आणखी वाचा..