दुसरी लाट ओसरण्याकडे जिल्ह्याची वाटचाल

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 110 अहवालापैकी 91 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 23 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 727 एवढी झाली असून यातील 83 हजार 392 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 773 रुग्ण उपचार घेत […]

आणखी वाचा..

गोदावरीबाबत खुलासा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा;मयताच्या नातेवाईक गोधळ घातल्याने ती चूक

  नांदेड, बातमी24:-तीन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या मयतावर उपचार करण्याचे नाटक म्हणजे पैसे उकळण्याचा प्रकार होता, या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने गोदावरी रुग्णालयावर गुन्हा नोंद झाला.या प्रकरणी आय एम ए ही संघटना धावून आली खरी, मात्र खुलासा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार समोर आला.त्यामुळे संघटनेच्या नैतिकतेवरच या निमीत्ताने प्रश्नचिन्ह लागत आहेत. कोरोनाचा संसर्ग […]

आणखी वाचा..

देगलूर बिलोली मतदार संघात किनवटची पुनरावृत्ती करू:- फारूक अहमद

  नांदेड,बातमी24:-देगलूर बिलोली मतदार संघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अचानक जाण्याने मतदारसंघात पोकळी निर्माण झाली ही पोकळी भरून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज्याचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या या महाभयंकर काळात मोठमोठ्या लोकप्रतिनिधींनी बचावात्मक भूमिका घेतली. मात्र सामान्य जनतेच्या हालअपेष्टांना थांबवण्यासाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करता वंचित […]

आणखी वाचा..

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवारासाठी पुढे या इटनकर यांचे आवाहन

नांदेड, बातमी24:-गोदावरी आणि इतर नद्या जरी असल्या तरी अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. आहे ते जलस्त्रोत व सिंचन सुविधा व्यवस्थित ठेवणे, त्यांचा पुर्ण क्षमतेने वापर होईल याचे नियोजन करणे ही आता काळाची गरज झाली आहे. जिल्ह्यात आजवर ज्या काही लहान मोठया सिंचन व्यवस्था, तलाव, बंधारे, लघु प्रकल्प निर्माण केले आहेत त्यातील वेळोवेळी लोकसहभागातून […]

आणखी वाचा..

20 मे साठी केंद्रनिहाय लसीचा पुरवठा जाहीर:-डीएचओ डॉ.शिंदे यांची माहिती

नांदेड,बातमी24:- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन डीएचओ डॉ.शिंदे यांनी केले   दिनांक 20 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या […]

आणखी वाचा..

राज्यात खळबळ उडालेल्या प्रकरणात त्वरित अहवाल सादर करा: – जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नांदेड,बातमी24:- तीन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या मयतावर केवळ पैसे काढून घेण्यासाठी उपचार करत असल्याचे भासवून प्रेताची विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.या प्रकरणाचे वृत्त ‘बातमी24.कॉम’ने समोर आणताच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मागच्या महिन्यात 16 एप्रिल रोजी अंकलेश पवार यांना कोरोनावर […]

आणखी वाचा..

पैसे उखळण्यासाठी मयतावर चक्क तीन दिवस उपचार;गोदावरी रुग्णालयातील प्रकार;गुन्हा नों

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24: काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार यांचा गब्बर चित्रपटातील एका रूग्णालयात मयत रुग्णांवर केवळ पैसे उखळण्यासाठी उपचार करण्याचे नाटक केले जाते आणि रुग्णालयाचा बोगसपणा कागदोपत्री पकडला जातो,अगदी तशीच घटना नांदेडच्या गोदावरी रुग्णलयात मयताच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने 18 रोजी मध्यरात्री गुन्हा नोंद झाला आहे. सिडको भागातील विणकर […]

आणखी वाचा..

महसूल मंत्र्यांकडून नांदेडच्या कार्याचे कौतुक

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:- सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले,असून हजारो लोक बाधित होत आहे, ऑक्सिजन,इंजेक्शन व बेड तुटवडा असताना नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे, हे कार्य नक्कीच प्रशंसनीय असून पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी टीमचे अभिनंदन करावे तितके कमी असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी ते कळमनुरी येथे […]

आणखी वाचा..

हवामान बदलामुळे प्रदेशाध्यक्षासह चार मंत्र्यांचा मुक्काम वाढला

नांदेड,बातमी24:- काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातील काँग्रेसचे दिगग्ज नेते नांदेड मार्गे कळमनुरी येथे हजर राहिले.मात्र हवामान बदल व मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने काँग्रेसच्या नेत्यांसह मंत्र्यांचा नांदेड दौरा वाढला आहे. राजीव सातव यांचे पुणे येथे रविवारी पहाटे निधन झाले.सोमवारी सकाळी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार झाले. या अंत्यविधीसाठी राज्यभरातील काँग्रेस नेते व मंत्रीगण नांदेड […]

आणखी वाचा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्षसह अनेक मंत्री नांदेडमध्ये दाखल

  नांदेड, बातमी24:- काँग्रेस राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.सोमवार दि.17 रोजा कळमनुरी येथे अत्यसंस्कार केले जाणार असून राजीव सातव यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कॉंग्रेसेचे अनेक दिगज नेते नांदेडमध्ये रविवारी रात्रीच मुकामी दाखल झाले.यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींचा समावेश आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे दिगग्ज नेते […]

आणखी वाचा..