पोलीस महासंचालकास नांदेड न्यायालयाची चपराक;गुटखा माफियांना अभय देणाऱ्या परिपत्रकास केराची टोपली

  जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:- गुटखा माफियांकडे साठा सापडला ,तरी अशांवर गुन्हा नोंद करताना 328 कलम लावू नये,असे परिपत्रक काढणाऱ्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकास नांदेड न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली,असून या प्रकरणातील एका गुटखा माफियास 328 कलमानव्ये पोलीस कोठडीची हवा खावी लागली. गुटखा माफियांना अभय देण्याचा पोलीस महासंचालकांनी केलेला प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला,असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे […]

आणखी वाचा..

संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध; प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पालन करा:-डॉ.इटनकर

  नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.कोरोनाच्या सासर्गाला अटकाव घातला यावा,या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कडक निर्बंधाच्या सूचना जारी केल्या आहेत. यात सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवता येणार आहेत.तसेच काही दिवस आठवडी बाजार सुद्धा बंद असणार आहे. दिलेल्या आदेशात म्हटले,की दि.12 मार्च ते 21 […]

आणखी वाचा..

वादग्रस्त बारगळ बनले पुन्हा पाणी पुरवठयाचे कारभारी; जि. प.ची डोकेदुखी वाढणार

  नांदेड, बातमी24:जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत देगलूर येथे उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या आणि मधल्या काळात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त कारभारी असताना वादग्रस्त कारभारामुळे बदनाम झालेले आर.एस.बारगळ यांना पुन्हा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून अतिरक्त कारभार देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यासाठी वर्ग एक च्या अधिकाऱ्यास शासनाने हटविण्याचा अजब प्रकार […]

आणखी वाचा..

केक कापून महिला दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांनी उंचावला सीईओचा मान

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- काल दिवसभर महिला दिनाच्या कार्यक्रमाची वर्दळ सर्वत्र पाहायला मिळाली, दिवसभर जिल्हा परिषदमधील महिलाच गौरव करण्यात दंग असलेल्या सीईओ वर्षा ठाकूर यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेला महिला दिन औरच ठरला.जिल्ह्यातील प्रमुख उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीईओ वर्षा ठाकूर यांच्या हस्ते केक कापून महिला दिनाचा समारोप केला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी दीड हजार कोटींची तरतूद:- पालकमंत्री चव्हाण

नांदेड, बातमी24 : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाटी सुमारे 1408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, […]

आणखी वाचा..

सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा:पालकमंत्री चव्हाण

नांदेड,बातमी24 :-आजच्या काळातील कोणतेही असे क्षेत्र सुटले नसून सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा उमटवला आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महिलांनी आपले कसब व योगदान पणाला लावून जे आव्हान पेलून दाखविले त्याला तोड नाही या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभसंदेशात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या […]

आणखी वाचा..

तुपा आरोग्य केंद्र येथे कोवीड लसिकरणाचा शुभारंभ

नांदेड,बातमी24:-तुपाच्या आरोग्य केंद्र कोविड १९ लसिकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.अंबुलगेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचा हस्ते करण्यात आला.यावेळी कोवीड १९ लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जेष्ठ नागरिक यांच्या सह सर्व जनतेला कोविड १९ अंतर्गत तुपा आरोग्य केंद्र कोवीड लसिकरणाचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला.यावेळी जिल्हा […]

आणखी वाचा..

असा असेल लसीकरणाचा उधापासून तिसरा टप्पा;जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

नांदेड,बातमी24:-कोरोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्यास सोमवार दि.8 मार्चपासून सुरुवात होत असून या लसीकरण मोहिमेत 60 वर्षावरील वृद्ध नागरिक तसेच 45 वर्षावरील आजारी रुग्णास लस मिळणार आहे. लसीकरणासाठी कोविंड अँपमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे.ज्यांनी नोंदणी केली नाही,अशांनी स्पॉट नोंदणी करून घेत लसीकरण कराव, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले. या लसीकरण मोहिमेअंतर्गत 45 ते 60 वयोगटातील […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; आज रोजी 230 रुग्णांची भर;त्रिसूत्रीचा वापर करा,कोरोना टाळा

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मागच्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे.रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 229 नवे रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवार दि.7 रोजी 1हजार 369 नमुने तपासण्यात आले.यात 1 हजार 109 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 229 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात आरटीपीसीआर चाचणीत 98 तर अँटीजनमध्ये […]

आणखी वाचा..

जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. रामोड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून प.बंगाला नियुक्ती…

  पुणे, बातमी २४:-भारत निवडणूक आयोगामार्फत आसाम, केरळ, तामिळनाडू,पश्चिम बंगाल आणि पांडेचेरी मधील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी   पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची दिनांक 5 मार्च 2021 च्या आदेशाद्वारे निवडणूक निरीक्षक ( ELECTION OBSERVER) म्हणून नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत.ते पश्चिम बंगाल […]

आणखी वाचा..