आमदार कल्याणकर यांनी अधिकार्‍यांना घेतले फैलावर

नांदेड, बातमी24ः-याही वर्षी कोरोना, बोगस बियाणे, अतिवृष्टी या सह किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना बँकांनी तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना आ. बालाजी कल्याणकर यांनी लिंमगाव येथील तिन्ही बँकांना केल्या आहेत. शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्या अन्यथा आपली गय केली जाणार नसल्याचे सांगतआ. बालाजी कल्याणकर यांनी अधिकार्‍यांना फै लावर […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील मृतांची संख्या चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी दि. 28 एप्रिल रोजी पीरबुर्‍हाण नगर भागातील ठरला. त्यानंतरच्या सहा महिन्यांच्या काळात तब्बल चारशे जणांना कोरोनाच्या संसर्गाने गिळकत केले आहे. मंगळवार दि. 29 रोजी आलेल्या अहवालात चार जणांच्या मृत्यूशी जिल्ह्यातील मृतांचा आकडा 398 इतका झाला आहे. त्याचसोबत 986 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 740 निगेटीव्ह तर 216 जणांचे […]

आणखी वाचा..

चार जणांचा मृत्यू तर दीडशे नवे रुग्ण

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने कोरोनाचे दीडशे संक्रमित आले आहेत. 263 जणांनी कोरोनावर मात केली.तर 50 हे मृत्यूशी लढा देत आहेत. सोमवार दि.28 रोजी 670 जणांची तपासणी करण्यात आली.494 निगेटिव्ह तर 154 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यात आरटी पीसीआर चाचणीत 74 व अँटीजनमध्ये 80 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 हजार 226 […]

आणखी वाचा..

पदभार स्वीकारलाच विभागवार केली पाहणी

  नांदेड,बातमी24: जिल्हा परिषदेचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांनी सोमवार दि.28 रोजी स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागवार पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मागच्या सहा महिन्यांपासून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे रिक्त होते. राज्य शासनाने गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांचे आदेश काढले. सीईओ म्हणून वर्षा ठाकूर यांनी सोमवार […]

आणखी वाचा..

संतप्त शेतकऱ्यांनी अडवला कृषिमंत्र्यांचा ताफा

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या गाड्यांचा ताफा मुखेड येथे शेतकऱ्यांनी अडविला. ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट पंचनामे करावे व पिक विमा मंजुर करावा या मागणीचे निवेदन  बालाजी पाटील ढोसणे,बालाजी सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर यांनी दिले.  ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहीजे,पिक विमा मंजुर झालाच पाहीजे,हम अपना अधिकार मागते,नही किसीसे भिक मागते म्हणत कृषि मंञ्याच्या […]

आणखी वाचा..

कृषीमंत्री शेत शिवारात; नुकसानीची केली पाहणी

नांदेड बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी बोलताना म्हणाले, की मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत […]

आणखी वाचा..

विष्णपुरी धरणाचे पुन्हा दहा दरवाजे उघडले

नांदेड, बातमी24ः- जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात वाढ झाल्याने 37 हजार 800 क्ससेक्यने विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत आहे. हे पाणी विष्णपुरी जलाशयात पोहचले आहे. त्यामुळे विष्णुपुरी जलाशयाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी या धरणातून 2 हजार 770 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे वंचितच्या नेत्याचे निधन; गत विधानसभेचे होते उमेदवार

नांदेड, बातमी24ःकाही दिवसांपूर्वी कोरोनामुळे संक्रमित झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार राहिलेल्या मुकुंद चावरे यांचे शनिवार दि. 26 रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. कोरोनाच्या संसर्गासह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ही वाढत आहे. यात काही दिवसांपूूर्वी मुकुंद चावरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारास […]

आणखी वाचा..

दिवसभरात जि.प.च्या एका अधिकार्‍यासह मुख्याध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

नांदेड, बातमी24ः दिवसभराच्या काळात जिल्हा परिषदेच्या एका सहाय्यक गट विकास अधिकार्‍यासह मुख्याध्यापकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची झाल्याची घटना शुक्रवार दि.25 रोजी घडली. जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्याचसोबत बाधित रुग्णांची संख्याही चिंता वाढविणारी ठरत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदमधील पंचायत विभागातील सहाय्यक गट विकास अधिकारी विवेक देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. यात […]

आणखी वाचा..

रेमडेसविअरचा तुटवडा भरुन काढावा : प्रविण साले

नांदेड, बातमी24: – जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु जिल्ह्यासह तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यातच रेमडेसविअर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने हा प्रकार कोरोना रुग्णांना मृत्यूच्या दारेत नेणारा असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने रेमडेसविअरचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा […]

आणखी वाचा..