माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी इटनकर

नांदेड,बातमी24:- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदार वर्तणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये जबाबदार वर्तणाची जाणीव व आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम हाती घेतली आहे. प्रत्येक घरा-घरातील अबाल वृद्धांपर्यंत आरोग्य सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात यावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेत राष्ट्रसेवा समजून उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपले योगदान […]

आणखी वाचा..

मुख्यमंत्री असताना आरक्षण देऊ शकले नाही,आताही तेच केले-जावळे

  नांदेड,बातमी24:- मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आजचा नसून पंचवीस वर्षे जुना आहे. उपसमितीचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सुद्धा आरक्षण देऊ शकले नाहीत, आता काय अपेक्षा धरावी,त्यांचा पायगुण चांगला नाही,अशी टीका अखिल। भारतीय छावा मराठा। युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अखिल भारतीय छावा […]

आणखी वाचा..

आमदार मामाच्या मोहिमेला भाच्याचा छेद

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः आतापर्यंत राजकारणात काका व पुतण्याची लढाई सर्वसुत राहिली आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांच्या एका अधिकार्‍याविरुद्धच्या मोहिमेला भाच्चे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी त्याच अधिकार्‍याच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे पाणी […]

आणखी वाचा..

नीटसाठी कोविड-19 पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना दिलासा

नांदेड,बातमी24:- आज होणाऱ्या नीटच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संघटन असलेल्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात कोविड-19 पॉझिटिव्ह (बाधित) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल, असे म्हटले आहे. याबाबत दिनांक 11 सप्टेंबर रोजी नीटच्या सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता नीटच्या परीक्षा सुरक्षित कशा होतील […]

आणखी वाचा..

आज सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात;तिनशे जणांच्या मृत्यूची नोंद

नांदेड, बातमी24ः कोरोनावर मात केलेल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद शनिवारी झाली आहे. यात 377 रुग्ण बरे झाले आहेत. आठ जणांच्या मृत्यूच्या नोंदीसह एकूण मृत्यांची संख्या तिनशे पार झाली.नव्याने 384 जण हे कोरोना बाधित झाले आहेत. तसे शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी 1 हजार 552 जणांची चाचणी करण्यात आली. 1 हजार 144 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 384 […]

आणखी वाचा..

दोन मंत्र्यांच्या पत्राला जिल्हा परिषदेचा दांडा

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सभा ऑनलाइन घेण्याबाबत शासनाचा आदेश काटेकोरपणे पाळला जातो. मात्र त्याच शासनाच्या मत्र्यांचे पत्रांना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न दुसर्‍यांदा झाला आहे.या प्रकरणाची सरकारकडून दखल घेतली जाऊ शकते. पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्याविरोधात जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हा परिषद सदस्यांची सुद्धा तीव्र नाराजी आहे. यात काही पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.परंतु; जिल्हा […]

आणखी वाचा..

खासदार म्हणून मलाही लाज वाटावी, अशी परिस्थिती;चिखलीकर झाले व्यथित

नांदेड, बातमी24ः डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थिती पाहून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्काच बसला, ही परिस्थिती पाहून खासदार म्हणून मला ही लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे, सगळा सावळा गोंधळ व्यथित करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सरकारची सुद्धा खरडपट्टी काढली. डॉ. शंकरराव चव्हाण […]

आणखी वाचा..

माजी मंत्री सावंत यांचे खा. चिखलीकरांना आव्हान

नांदेड,बातमी24ः-मराठा आरक्षणासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करणार्‍या े खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी या विषयावर खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी दिले.दोन दिवसांपूर्वी चिखलीकर यांनी मराठा आरक्षणांवरून अशोक चव्हाण यांच्यावर निशाना साधला होता. गुरुवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदे आयोजित करून मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले […]

आणखी वाचा..

आतापर्यंतची सर्वाधिक मृत्यूची नोंद; रुग्ण संख्या पुन्हा चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद शुक्रवारी नोंदविली गेली, असून तब्बल बारा जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. तर पुन्हा एकदा मृत्यूचा आकडा चारशेच्या जवळ जाऊन पोहचला आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे, दुरुस्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी 261 झाली आहे. शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी 1 हजार 656 जणांची तपासणी करण्यात आली. […]

आणखी वाचा..

नांदेडच्या संदीप काळे यांच्या ट्वेल्थ फेल पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,बातमी24:- आयपीएस मनोजकुमार शर्मा आधारित असलेल्या अनुराग पाठक यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद पत्रकार, लेखक संदीप काळे केला आहे .ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘ट्वेल्थ फेल’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या हस्ते झाला. शरद पवार म्हणाले,की मुंबई असो की, महाराष्ट्र, देश आपण सुरक्षित आहोत, आपण आनंदाने बागडतोय त्याचं […]

आणखी वाचा..