सामाजिक न्याय विभागासह सचिवांवर खोटे, दिशाभूल करणाऱ्यांना आरोपांना खुलाशातून सडेतोड उत्तर

मुंबई,बातमी24:- सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, मात्र राज्यातील सर्व सामान्य जनतेमध्ये/समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती ठराविक संघटना व लोकांकडून दिली जात असून आंदोलने करण्यात येत आहेत. सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या विरोधात निवेदने दिले जात आहेत. त्याचप्रमाणे […]

आणखी वाचा..

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ. लहाने ठरले दुसरे आयुक्त; सेवेशी प्रामाणिकपणा जपणारे अधिकारी

नांदेड, बातमी24:- जग एका नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उभं होत,त्याच वेळी शहराच्या कारभाराची सूत्र हाती घेत, कोरोनापासून शहरातील नागरिकांचा बचाव व्हावा,यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले,त्या डॉ.सुनील लहाने यांनी नांदेड-वाघाला महापालिका आयुक्त म्हणून तीन वर्षे पूर्ण केली. तीन वर्षांचा आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ.लहाने हे दुसरे अधिकारी ठरले आहेत.याच सोबत ते प्रशासक म्हणून शहरातील नागरिकांचे पूर्णपणे […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हाधिकारी राऊत यांच्यासाठी नांदेड ठरली गुड न्यूज;राऊत कुटूंबात कन्येचे आगमन

नांदेड,बातमी24:आपल्या शांत,संयमी आणि मितभाषी स्वभावाने ज्याची अल्पवधीत जिल्ह्याला परिचय झाला असे नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासाठी ही नांदेड येथील कारकीर्द ही आयुष्यभर स्मरणीय ठरणार आहे,त्याचे कारण ही तसेच आहे.आज राऊत दांपत्यास कन्यारत्न प्राप्त झाले.कुटूंबातील पहिली बेटीच्या जन्माचे स्वागत ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.विशेषतः या कन्येचा जन्म हा नांदेड येथील शाम नगर शासकीय महिला व बाल […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी राऊत यांचे भावनिक पत्राने घातली सरपंच व शिक्षण विभागाला साद

नांदेड,बातमी24:- बालविवाह सारखी कुप्रथा अजूनही समाजातून हद्दपार झाली नाही. एकाबाजूला मुलींची शिक्षणासाठी असलेली ओढ, अल्पवयात लग्नासाठी दिलेला नकार ग्रामीण भागातील अनेक परिवारात स्विकारला जातोच असे नाही. काही कुटूंबात कायद्याने बंधनकारक असलेल्या वयाच्या अटीला दूर्लक्ष करून बालविवाह सारखे प्रकार दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षणाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना भावनिक आवाहन करीत त्यांच्या […]

आणखी वाचा..

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मयत संजय कंधारकर यांच्या कुटूंबियास आर्थिक मदत

नांदेड,बातमी24- पत्रकार संजय कंधारकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले .स्व. कंधारकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटूंबियावर हालाखीची आर्थिक परिस्थिती ओढवली आहे.अशा बिकट परिस्थितीत त्यांच्या कुटूंबियांना मदतीचा हातभार लागावा,या उद्देशाने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यात आले. मागच्या आठवड्यात दि.3 रोजी स्व. कंधारकर हे त्यांच्या मुलास बारावीच्या परीक्षेसाठी सोनखेड […]

आणखी वाचा..

आर्थिक निर्भरता यातच महिलांच्या सुरक्षिततेचा मार्ग – वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी 24 :- महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तिची आर्थिक निर्भरता व स्वालंबन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकवेळी समोर येतो. जिच्यामुळे शेतीचा शोध लागला, जिच्या योगदानातून शेती फुलवली जाते त्या शेती असलेल्या ग्रामीण भागातील महिलांना अधिक सुरक्षित जर करायचे असेल तर आर्थिक निर्भरता ही अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शेती व शेतीपूरक उद्योगात दडलेल्या रोजगाराच्या संधी महिलांच्या हाती असणे […]

आणखी वाचा..

फायदेशीर शेतीसाठी उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड,बातमी24:- फायदेशीर शेतीसाठी उपलब्ध असलेल्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, नानाजी कृषी संजीवनी योजना, स्मार्ट प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी साहाय्य अशा कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कृषि महोत्सव व माविमच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन […]

आणखी वाचा..

शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24- गाव स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या कामांना केंद्रस्थानी ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामे पूर्ण करावीत. तसेच राज्य शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावेत असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा त्यांनी आज दीर्घ आढावा घेतला. आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जनजागृती […]

आणखी वाचा..

एकेकाळी विधिमंडळ गाजविणारी मुलूख मैदानी तोफ जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे काळाच्या पडद्याआड

नांदेड, बातमी24:-माजी आमदार व माजी खासदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी एक जानेवारी रोजी रविवारी दुपारी १:२० वाजता उपचार दरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.शेतकरी कामगार पक्षाचा पताका आयुष्यभर घेऊन जगलेले भाई केशव धोंडगे […]

आणखी वाचा..

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी: जिल्हाधिकारी राऊत यांचे निर्देश

नांदेड,बातमी 24 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून याचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व तालुका प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. जिल्ह्यात नुकत्याच काही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार […]

आणखी वाचा..