शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड, बातमी24६ : जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अद्यापही पेरणी करण्याचे दिवस गेलेले नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र […]

आणखी वाचा..

अतिवृष्टीतील शेतकर्‍यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय;  कृषीमंत्री सत्तार यांच्याकडून पुरग्रस्त भागाची पाहणी

नांदेड,दि.21:- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचे नियोजन आम्ही करत आहोत. याबाबत येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. महसूल यंत्रणा व कृषि विभाग यांनी समन्वयातून उरलेले पंचनामे तात्काळ कसे पूर्ण होतील याचे नियोजन करण्याचे […]

आणखी वाचा..

आज होणार 9 हजार वटवृक्षांची लागवड: -सीईओ वर्षा ठाकूर यांचा उपक्रम

नांदेड, बातमी24- वटपौर्णिमेनिमित्त आज मंगळवार दिनांक 14 जून रोजी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात सुमारे 9 हजार 176 वडवृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती नादेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडी मध्ये जिल्हा परिषदे अंतर्गत […]

आणखी वाचा..

नकाशावरून हद्दपार केलेल्या जिल्ह्याला विकासात गतवैभवप्राप्त मिळवून देणार:-पालकमंत्री चव्हाण

  नांदेड,बातमी24:- भाजप काळात नांदेड जिल्हा विकास कामांच्या बाबतीत राज्याच्या नकाशावरून हद्दपार झाला होता.मात्र महा आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात विकासाची गंगा खेचुन आणली.पुढील तीन वर्षात विकास कामाच्या माध्यमातून कायापालट केला जाणार असून पुन्हा विकासाचे गतवैभव मिळवून दिले जाईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या कृषी […]

आणखी वाचा..

आ. कल्याणकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर -अवजारे वाटप

नांदेड,बातमी24 :- अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना पिक विमा पोहोचावा यासाठी आम्ही आग्रही असून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केले. राज्य शासनाच्या कृषी  यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल वरील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने वडवणा येथे ट्रॅक्टर व कृषी अवजारे वाटपाचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. […]

आणखी वाचा..

दोन लाख शेतकरी करणारा मोबाईलद्वारे एकाच दिवशी पीक पाहणी:जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नांदेड,बातमी24:- अतिवृष्टीने सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे.परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी लक्षात घेता शासनाकडून पीक विमा कंपन्यांना तशी ताकीद देण्यात आलेली आहे. शेतात झालेल्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीना तात्काळ वेळेत दिली जावी,यासाठी ई. पिकपाहणी अँप शासनाने सुरू केले.या अँपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार इतके शेतकरी स्वतःच्या शेतातील हे […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते धनेगाव येथे बांबु लागवड मोहीम

नांदेड,बातमी24 :- जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथे  राज्य शासनाचा कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते आज करण्यात आला. बांबू लागवड विषयी प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज बांबू लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. […]

आणखी वाचा..

नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी:- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय […]

आणखी वाचा..

पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :-प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन […]

आणखी वाचा..

अतिवृष्टी नुकसानीची शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीस तात्काळ माहिती कळवावी – जिल्‍हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:-मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्‍या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्‍ये कळवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्‍यास, भुस्‍खलन, गारपीट, ढगफुटी […]

आणखी वाचा..