अन्यथा कठोर कारवाई:-विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर कायदा हातात घेतल्यास कारवाई:-जिल्हाधिकारी राऊत

नांदेड,बातमी.24:- समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली झालेल्या आहेत त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांसहित सर्व समाजांनी भोगलेले आहेत. रोजचे शांततामय जीवन आणि जीवन व्यवहार जर सुरळीत चालवायचे असतील तर रस्त्यावरील समाज विघातक कृत्याचा निषेध केला पाहिजे. सकल मराठा समाजाने आजवर ज्या शांततेने आंदोलन केले त्याला जर […]

आणखी वाचा..

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा सर्वोत्तम उपाय – सौ.प्रणिता देवरे चिखलीकर

नांदेडयोगाथॉनला नांदेडमध्ये उदंड प्रतिसाद, जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांची प्रमुख उपस्थिती नांदेड : अलीकडच्या काळात मानवी जीवन अत्यंत व्यस्त आणि धक्कादुकीचे झाले आहे . त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधीने आपण ग्रस्त होत आहोत. परिणामी मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. मानवी आरोग्य अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक […]

आणखी वाचा..

यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात;जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतले सहपत्नीस दर्शन

श्रीक्षेत्र माळेगाव, बातमी24:-उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते […]

आणखी वाचा..

स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर झेंडा” सप्ताह – डॉ. इटनकर यांचे स्तूत्य अभियान

नांदेड,बातमी. 24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम […]

आणखी वाचा..

बुद्धांची शिकवण जगाला तारणारी:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24:-अडीच हजार वर्षापूर्वी जगाला जगण्याचा मार्ग तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दाखविला, हजारो वर्षांनंतर ही बुद्धांनी जगाला दिलेले तत्वज्ञान हेच आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू असून आपल्या जगण्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.त्या बुद्ध पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात एकाच दिवशी 55 हजार जणांचे लसीकरण;प्रशासनाचे महत्वपूर्ण पाऊल

नांदेड, बातमी24:- भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे मुहूर्त साधत शुक्रवार दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाभर व्यापक स्वरूपात कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात आले.यामध्ये 55 हजार जणांनी स्वतःचे लसीकरण करून घेत कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वपूर्ण सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आले. कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी सर्व […]

आणखी वाचा..

भोसी पॅटर्न ग्रामीण भागास कोरोनामुक्तीसाठी फलदायी:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- कोरोनामुक्‍तीसाठी भोकर तालुक्‍यातील भोसी गावाने राबविलेल्‍या पॅटर्नमधून 119 कोरोना बाधित रुग्‍ण पंधरा दिवसानंतर कोरोनामुक्‍त झाले आहेत. हा पॅर्टन जिल्‍हयात राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. काल बुधवार दिनांक 12 मे रोजी भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रातंर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकिय […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी इटनकर यांनी घेतला कोविड रुग्णालय आढावा

नांदेड,बातमी24 :- नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शासकीय कोविड केअर सेंटर, रुग्णालयाच्या सुरक्षिततेसंबंधी आढावा घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांना योग्य ती दक्षता घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेल्या ऑक्सीजन टँकची त्यांनी स्वतः पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मनपा […]

आणखी वाचा..

नऊ जणांचा मृत्यू तर सव्वा नऊशे बाधितांची भर

  नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्यात रविवारी आलेल्या अहवालात 927 बाधितांची भर पडली,असून 9 जणांचा बळी गेला आहे. तसेच 309 जनांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात 4 हजार 673 तपासण्या करण्यात आल्या.यात 3 हजार 616 निगेटिव्ह तर 927 जण बाधित झाले. आरटीपीसीआर चाचणीत 409 तर अंटीजनमध्ये 526 जण असे 927 जणांचा समावेश आहे. यात 445 जण […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये आज गज़लकार इलाही जमादार अभिवादन कार्यक्रम

नांदेड, बातमी24:-सुप्रसिद्ध गज़लकार इलाही जमादार यांना नांदेड येथे शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी नांदेडकरांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूर्णा रोडवरील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नांदेडकरांच्यावतीने या कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या गज़ल, गायन, वाचन आणि त्यांच्या […]

आणखी वाचा..