जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची सायकलद्वारे लसीकरण जनजागृती;नांदेड ते कंधार प्रवास
नांदेड, बातमी24:-आपल्या सकारात्मक कार्यातून परिवर्तनाची बीजे पेरणाऱ्या नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेतले.आता कोरोनाचे संपूर्ण उचाटन करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली असून सायकलद्वारे जागर केला.यावेळी त्यांनी व त्यांच्या सायकल प्रेमी मित्रांनी नांदेड ते कंधार असा सायकल प्रवास केला.या सायकल रॅलीत डॉ.इटनकर यांच्या पत्नी डॉ.सौ इटनकर या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. […]