मंत्री चव्हाण यांच्या संस्थेतील विद्यार्थींनीची तीन मंत्र्यांकडून दखल

नांदेड, बातमी24ः-पाचशे पैकी पाचशे गुण मिळविणार्‍या नांदेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थींनीची दखल राज्याच्या तीन मंत्र्यांनी घेतली. यामध्ये उर्जामंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांनी स्नेहल कांबळे हिचे कौतुक व अभिनंदन करणारे व्टिट केले. मात्र या संस्थेतील पदाधिकार्‍यांना मात्र इतर मंत्र्यांनी अभिनंदन केल्यानंतर जागा आला.तर या संदर्भात […]

आणखी वाचा..

खासदार पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा  अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.असे निकटवृतीयांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यावर उपचार सुरु […]

आणखी वाचा..

बदल्या संदर्भात आजी-माजी अध्यक्षांची भूमिका ठरली महत्वाची

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे सार्वत्रिक बदल्या रद्द होऊ शकल्या. जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या बदल्यांचा भरणारा बाजार थांबविण्यात […]

आणखी वाचा..

सत्यवादी होण्याच्या प्रयत्नात आमदार राजेश पवार मतदारसंघात एकांकी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे या वेळी हात मोकळा सोडल्यामुळे भरघोस मतांनी आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांना सत्यवादी राजा हरिषचंद्राचा साक्षात्कार व्हायला लागला असून मतदारसंघात रामराज्य अवतरल्यासारखे त्यांना भासत आहे. त्यामुळे ते वाळू,राशन व अधून-मधून पोलिसांच्या विरोधात उभे राहतात, कधी-कधी तर माझे कुणीच ऐकत नाही, असे निवेदन […]

आणखी वाचा..

राज्यपालासह मुख्यमंत्र्यांची भेट – भाजप खासदार चिखलीकर

नांदेड, बातमी24ः- राज्यातील मुदत संपलेल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासह अन्य महामंडळाला मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोशियारी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट असल्याचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगत या मागणी संबंधी शुक्रवारी पत्र पाठविल्याचे खासदार चिखलीकर यांनी कळविले. राज्यातील विविध भागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यातील अनेक भागामध्ये वैधानिक विकास महामंडळाची […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातून दहा हजार पत्रे शरद पवारांना जाणारः किशोर देशमुख

जिल्ह्यातून दहा हजार पत्रे शरद पवारांना जाणारः किशोर देशमुख नांदेड, बातमी24ः श्री राम जन्म मंदिर बांधण्यास विरोध केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा ग्रामीणच्या वतीने दहा हजार पत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठविले जाणार असून हे काम अंतिम टप्यात आले असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र […]

आणखी वाचा..

एन-95 मास्कवरून डी.पी. सावंत यांचे केंद्रावर टीकास्त्र

नांदेड,बातमी24:- आरोग्य मंत्रालयाला आता हा एन-95 मास्क आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या संशोधन, प्रयोग व विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, असे मत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. डी.पी. सावंत म्हणाले,की यांनी देशात कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझर व मास्कचा वापर […]

आणखी वाचा..

शासकीय बंगल्यावरील गटारी आमवस्या दोन कर्मचार्‍यांच्या मुळावर

नांदेड,बातमी24ः- सोमवार मास खाणे काही वर्ज्य मानतात.त्यामुळे बहुतांशी जणांनी गटारी आमवस्या रविवारीच साजरी केली. जिल्हा परिषदेच्या एका सभापतीच्या बंगल्यावर साजरी करण्यात आलेल्या गटारी आमवस्या एका शिपाई व चालक महागात पडल्याची चर्चा चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार अमरनाथ राजूरकर यांचा कोरोनाचा रिपार्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सोबत कायम राहणार्‍या व संपर्क आलेल्या सर्वांचे धाबे चांगलेच दणाणले होते. प्रत्येकाने […]

आणखी वाचा..

शिफ ारशीवर बॉस होण्याच्या स्वप्नांवर पाणी!

  नांदेड,बातमी24ः-कोरोनाच्या महामारीत कुठल्याही निवडणुका होणे नाही. मुदत संपलेल्या महापालिका,नगरपालिकांवर प्रशासनाचे प्रशासक आले, असताना ग्रामपंचायवर पालकमंत्र्यांच्या शिफ ारशीनुसार प्रशासक नेमण्याचा प्रकार नियमबाह्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ठरविले आहे. त्यामुळे शिफ ारशीवर बॉस होण्याचे स्वप्न पाहणार्‍या गावातील काही मोहरक्यांच्या स्वप्नांवर पाणी फे रले आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आदेश दिले […]

आणखी वाचा..

सत्ताधार्‍यांनाच शासकीय यंत्रणा आणि येथील डॉक्टरांवर भरवसा न्हाय काय

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे.कोरोनाचा संसर्ग कोणास होईल, याचा नेम नाही. मात्र नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सामान्यांपासून ते काही असमान्य गणमुर्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र सामान्य रुग्ण हे शासकीय रुग्णालयात येथे फ क्त गोरगरिब जनता उपचार घेत असताना सत्ताधारी मायबाप नेतेमंडळी नांदेड सोडून उपचार घेत आहेत. येथील सत्ताधार्‍यांच सरकारच्या शासकीय रुग्णालय किंवा […]

आणखी वाचा..