घरोघरी तिरंगासाठी प्रत्येकाने पुढे यावे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड,बातमी. 24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभाग प्रमुखांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा […]