माळेगाव यात्रेसाठी निर्बंध कायम;मूलभूत सुविधा दिल्या जाणार;आपत्तीचा विचार करता अध्यक्ष अंबुलगेकर यांची समंजस भूमिका

नांदेड, बातमी24:- पुढील महिण्यात होऊ घातलेल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रेबाबत जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी यात्रा भरावी,यासाठी आग्रही असलेली तरी, प्रशासनासमोर कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकट आ वासून बसले आहे. या सगळ्या संकटाचा विचार करता जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी समंजसपणाची भूमिका घेत कोरोना आपत्ती बाबत असलेले सर्व निर्बंधाचे पालन करून पाणी व विजेची सुविधा दिली जाईल,त्याचसोबत […]

आणखी वाचा..

पावती नसेल तर रेती साठा करणाऱ्या व्यक्तीं विरुध्द कारवाई:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

नांदेड,बातमी 24:-मनपा, नगरपालिका, ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी बांधकाम व्‍यावसायिकांनी वाळु, रेती विकत घेताना वैध पावती व परवाना असल्‍याशिवाय खरेदी करु नये. अन्‍यथा संबंधीताविरुध्‍द कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला  आहे. जिल्‍ह्यातील जप्‍त रेती साठयाच्‍या लिलावाच्‍या अनुषंगाने करावयाची कार्यपध्‍दती शासन निर्णय 3 सप्टेंबर 2019 अन्वये निश्‍चीत करण्‍यात आलेली आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी […]

आणखी वाचा..

शहीद जवान डुबुकवाड यांना अखेरचा निरोप; शहीद जवान अमर रहे” च्या घोषणेने वातावरण भावूक

नांदेड,बातमी24:-  कंधार तालुक्यातील बाचोटीचे भुमीपूत्र वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या पार्थिवावर आज बाचोटी येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मिर येथील कुपवाडा येथे भारत मातेचे रक्षणासाठी वीर जवान नायक बालाजी यांना कर्तव्य बजावतांना दिनांक 18 डिसेंबर रोजी वीर मरण आले. भारतीय सैन्यदलातील 101 INF BN (TA) मराठा LI दलातील लान्सनायक म्हणून ते कर्तव्यावर होते. […]

आणखी वाचा..

माळेगाव येथे केवळ नैमित्तिक पूजेला मुभा; संभाव्य धोका विचारात घेता प्रशासनाचा निर्णय

नांदेड,बातमी24:- कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉन संसर्गाच्या धोक्यापासून जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे हे अधिक अत्यावश्यक आहे. ओमायक्रॉन पाठोपाठ जनावरांमध्येही लाळखुरकत सारखे सदृश्य आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याबाबत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, उपायुक्त पशुसंवर्धन व पोलीस विभाग यांनी सादर केलेल्या सर्व बाबींचा साकल्याने विचार करण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत अधिक विचार करुन माळेगाव […]

आणखी वाचा..

जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या;अन्यथा कारवाई होईल:-सीईओ वर्षा ठाकूर यांची ताकीद

नांदेड,बातमी24:-ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांना डिसेंबर अखेर शंभर टक्के नळजोडणीचे काम पुर्ण करावे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे आराखडे पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले. आज बुधवार दिनांक 15 डिसेंबर रोजी भोकर पंचायत समिती येथे अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्या वेळी […]

आणखी वाचा..

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक!: अशोक चव्हाण

    नांदेड,बातमी24:-आरक्षणांबाबत केंद्र सरकारने नेहमीच नकारात्मक भूमिका घेतली असून, त्यामुळेच मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही धक्का लागल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय निराशाजनक आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळेल, अशी आशा आम्हाला […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या निर्णयामुळे मानकऱ्यांचा सन्मान

नांदेड,बातमी24:- भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही होण्याची शक्यता कमी आहे.यात्रा यावेळी होऊ अथवा न होवो मात्र माळेगाव येथील मानकऱ्यांना यावर्षी पासून प्रत्येकी मानकरी यांना 51 हजार रुपये देऊन मानसन्मान केला जाणार आहे.मानकऱ्यांचा सन्मान करणाऱ्या मंगाराणी अंबुलगेकर पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्ष ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत मानकरी यांच्या मानधनाचा […]

आणखी वाचा..

लसीकरणासाठी सीईओ वर्षा ठाकूर पोहचल्या आदिवासी पाड्यावर;शक्ती नगरमध्ये शंभर टक्के लसीकरण

नांदेड,बातमी24:- कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी किनवट तालुक्यात दौरा केला. तालुक्यातील घोगदरवाडी अंतर्गत शिवशक्ती नगर या आदिवासी पाड्यावर त्यांनी रात्री सात वाजता भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ ठाकूर यांनी लसीकरणा संदर्भात गावक-यांचे प्रबोधन केले. त्यानंतर नागरिक लसीकरणासाठी स्वतः होऊन […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हा परिषदेचे घर घर लसीकरण; अधिकारी-कर्मचारी रजा रद्द

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी चिंतेचा विषय ठरणारी असून यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने घर-घर लसीकरण हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर जाऊन लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे लागणार आहे,यासाठी अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्याचा निर्णय सीईओ वर्षा ठाकूर यांनी घेतला असल्याचे […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागाच्या लसीकरणासाठी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या बूस्टर प्लॅन

  नांदेड,बातमी24:- देशात कोरोनाचा नवीन धोकादायक व्‍हेरियंट ओमायक्रॉनचे संकट निर्माण झाल्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले आहे. या संकटापासून बचाव करण्‍यासाठी 100 टक्‍के लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने विविध उपक्रम हाती घेवून हे काम 100 टक्‍के पूर्ण केले जाणार आहे. ग्रामीण भागातून कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेणा-यांची आकडेवारी 70 टक्‍क्‍यांवर गेली आहे. […]

आणखी वाचा..