माहूर गडावरील ‘रोप वे’ ला गती ! राज्य शासन व ‘वॅपकॉस’मध्ये करार

नांदेड,बातमी24 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर ‘रोप वे’ उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’ मध्ये करार झाला आहे. यामुळे  माहूरगडच्या विकासकामांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि ‘वॅपकॉस’चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या […]

आणखी वाचा..

पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस;वयाच्या 26 व्या वर्षी सुमितकुमार धोत्रे यांचे पहिल्या प्रयत्नात यश

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- केंद्रीय लोकसेवा सेवा आयोगाचा अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.24 रोजी जाहीर झाला आहे.यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटूंबातील सुमितकुमार धोत्रे याने पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमितकुमार याने वयाच्या 26 व्या वर्षी इतके मोठे यश संपादन केले.सुमितकुमार याचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका […]

आणखी वाचा..

विद्यार्थ्यांना दाखला न देणाऱ्या शाळांवर कारवाई करा:-सीईओ वर्षा ठाकूर

  नांदेड, बातमी24:- दहावी पाससह इतर वर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचे दाखला पत्र शाळेकडून अडविले जात आहे. आशा आशयाच्या तक्रारी प्राप्त होत आहे, त्यामुळे ज्या शाळांकडून विद्यार्थी यांचे दाखला पत्र दिले जाणार नाही, अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षणाधिकार्यांना दिले. सीईओ वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विभागाची बैठक […]

आणखी वाचा..

यापुढे प्राथमिक शाळांच्या उभारणीवर अधिक भर:-पालकमंत्री चव्हाण

नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या सेवा-सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने मागील 2 वर्षे महाविकास आघाडी शासनाने भर देऊन काम केले आहे. कोरोनाच्या लाटेतून सावरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपलब्धता ही पणास लागली. काही वर्षांपूर्वी आपण दूरदृष्टि ठेऊन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना, सेवा-सुविधांना भक्कम करण्याचे काम केले. आता वाढत्या लोकसंख्येनुसार अनेक गावांच्या […]

आणखी वाचा..

गणेश विसर्जन तयारीची आ. राजूरकर,महापौर येवनकर यांच्यासह अधिका-यांची पाहणी

नांदेड,बातमी24: –  नांदेड शहरातील श्रीचे विसर्जन उद्या दि.19 रोजी होणार आहे.. गोदावरी व आसना नदीच्या परिसरात यासाठी वेगळे तलाव करण्यात आले असून श्री विसर्जनाच्या ठिकाणीची पाहणी  दि. 18 रोजी आ.अमरनाथ  राजूरकर, महापौर सौ .मोहिनी येवणकर यांनी  अधिका-यांसह केली.  यावेळी विसर्जनादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी  महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना  केली आहे. यावेळी […]

आणखी वाचा..

चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव वेळेत सादर करा:-शिक्षण समिती बैठकीत बेळगे यांच्या सूचना

नांदेड,बातमी24:-शिक्षकांची सेवा 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव गटशिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्यास तपासून तात्काळ सादर करावेत, अशी सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज शिक्षण समितीच्या बैठकीत केली. बैठकीस ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड ,साहेबराव धनगे ,संध्याताई धोंडगे ,अनुराधा पाटील ,जोत्स्ना नरवाडे,शिक्षक सदस्य बसवराज पाटील ,शिक्षणतज्ञ सदस्य संतोष देवराये यांची […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकाऱ्यांचे मिशन लसीकरण:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 75 हजार लसीकरण उद्दिष्ट

नांदेड,बातमी24 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.  आरोग्य विभाग, महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून 75 हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील या […]

आणखी वाचा..

राजूरकर यांनी घेतल मनपा प्रशासनाला फैलावर; मूलभूत सोयीसुविधाकडे लक्ष देण्याची ताकीद

नांदेड,बातमी24- विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशय तुडूंब भरलेला असताना नांदेड शहराला आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी का मिळत नाही? असा खडा सवाल करत आ. अमरनाथ राजूरकर यांनी मनपा प्रशासनाची आज दि. १४ रोजी चांगली झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासोबतच शहराच्या अनेक भागात चुकीच्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यात […]

आणखी वाचा..

तत्कालीन नियोजन अधिकारी कोलगणे यांना दीड वर्षांनी न्याय

  नांदेड, बातमी24:नांदेड येथे तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांना कोणतेही कारण किंवा कुठल्याही प्रकारची शास्ती नसताना दीड वर्षांपासून शासनाने सेवेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यांना शासनाने दीड वर्षानंतर पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथील नियोजन उपायुक्त म्हणून पदोन्नतीने रुजू होण्यासाबधी आदेश काढले.या संबंधीचे आदेश दि.14 रोजी प्राप्त झाले. एक कर्तव्य दक्ष अधिकारी अशी […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला श्री स्थापनेतून कोरोनामुक्तीसह पर्यावरणाचा संदेश

नांदेड,बातमी24:- शिक्षणाने डॉक्टर तर सेवेने थेट सनदी अधिकारी असणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची प्रत्येक कृतीही सामाजिक जाणिव समृद्ध करणारी असते.श्री स्थापनेतून त्यांनी व त्यांच्या डॉक्टर सहचरणीने कोरोनामुक्तीसह इकोफ्रेंडली गणपती असा पर्यावरणमुक्तीचा संदेश दिला. शुक्रवारी सर्वत्र गणरायाचे आगमन उत्सवपूर्ण वातावरणात आगमन झाले. गणेश मंडळ भक्तांनी सुद्धा कोरोना नियमांचे पालन करत श्री चे स्वागत केले. ठिकठिकाणी […]

आणखी वाचा..