गणेश मंडळांनी कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा:- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर
नांदेड,बातमी24:- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन याही वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना कोरोना लसीकरण शिबीर, मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजारांबाबत जनजागृती सारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गणेशोत्सवासंदर्भात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता […]