सीईओ मीनल करणवाल सादर करणार आपला पहिलाच अर्थसंकल्प,आज एक वाजता सभा

नांदेड,बातमी24; जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकास मान्यतेची बैठक मंगळवार दि. 5 मार्च रोजी होत असून सहा महिन्यांपूर्वी आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीईओ तथा प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या सीईओ ठरणार असून यापूर्वी सीईओ तथा प्रशासक म्हणून वर्षा ठाकूर-घुगे यांनी सलग दोन वेळा अर्थसंकल्प […]

आणखी वाचा..

कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘ड्रोन’चा वापर;जिल्हाधिकारी राऊत यांच्या संवेदनशील केंद्रांना भेटी

नांदेड बातमी 24 :- आजपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने ड्रोन कॅमेराचा वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना आज भेटी देऊन या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा केली. 21 फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली […]

आणखी वाचा..

मीनल करणवाल यांनी पाडला ‘ई–फाईलिंग ट्रेकिंगचा पायंडा;इतर विभागात ही होणार सुरुवात

नांदेड,बातमी24- विविध विभागातील प्रलंबित संचिका निकाली काढण्‍यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेत ई- फाईल ट्रॅगिंक सिस्टिमची सुरवात करण्‍यात आली आहे. यापूर्वी तत्कालीन सीईओ राहीलेल्या अभिमन्यू काळे यांनी ई-फाईल ट्रेकिंगप्रणाली अंमलात आणली होती. प्रयोगशील  कामामुळे आपली ओळख निर्माण केलेल्या सीईओ मीनल करणवाल यांनी प्रायोगिक तत्वावर या प्रणालीव्‍दारे शिक्षण व आरोग्‍य विभाग ऑनलाईन केला असून पुढील टप्प्यात वित्त व […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेसोबत:-भास्करराव पाटील खतगावकर

नांदेड,बातमी24:-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे.त्यांचा भाजप जाण्याने मराठवाडा व नांदेड जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील,त्यामुळे चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो,आम्ही त्यांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल आमदारकी व पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा […]

आणखी वाचा..

क्षयमुक्त गाव मोहिमेसाठी विकास आराखड्यात तरतूद;-सीईओ मीनल करनवाल

नांदेड,बातमी24- केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त पंचायत मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी सबंध राज्यात मोहीम चालू आहे. केंद्र शासन आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या करारानुसार पंचायत राज संस्था व ग्रामपंचायत यांनी सदर मोहिमेत ग्रामपंचायत विकास आराखड्यांमध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी निधीची तरतुदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यात तरतूद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी […]

आणखी वाचा..

क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड, बातमी24 :- दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा, अभ्यासासोबत त्यांच्यातील इतर कला गुण जोपासले जावेत यासाठी दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांनी सर्वसामान्यांसारखे आपण सर्व गोष्टी करु शकतो हा आत्मविश्वास बाळगून या स्पर्धेत उतरावे व येथून एक नवी आठवण घेवून जावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषद समाज […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार

नांदेड,बातमी. 24:- निवडणूकांच्या माध्यमातून भारतीय लोकशाही अधिक सशक्त होत जाते. यात मतदारांचे नियोजनबध्द शिक्षण व निवडणुकीतील त्यांचा महत्वपूर्ण ठरणारा सहभाग याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागातुन उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. हा पुरस्कार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जाहिर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी अभिजित राऊत प्रशासनातील पारदर्शक चेहरा

नांदेड जिल्हाधिकारी म्हणून दीड वर्षांपूर्वी जळगाव येथून बदलीने आलेले अभिजित राऊत सर यांना पहिल्या दिवसापासून पाहत आलो आहे.मी आणि माझे काम हेच ब्रीद हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले आहे. प्रचंड संयमी माणूस,कमी बोलणं अगदी मितभाषी आणि इतरांचे प्रश्न अधिक समजून घेणं, इतकंच नव्हे तर ते प्रश्न खालपर्यंत कसे मार्गी लागतील,याची पाठपुरावा करण्याची पद्धती असे अनेक […]

आणखी वाचा..

देवस्वारी, पालखी मिरवणूकीने माळेगाव यात्रेला सुरूवात:-जि. प.सीईओ मिनल करणवाल

नांदेड, बातमी24:-दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेची सुरुवात दि. १० जानेवारी रोजी देवस्वारी, पालखी मिरवणूकीने होणार आहे. यावेळी विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात येईल. ही यात्रा चार दिवस भरवली जाणार आहे. यात्रेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटाचे वस्तू प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदतर्फे आयोजित करण्यात आले आहेत,अशी […]

आणखी वाचा..

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे जिल्ह्यात घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण

नांदेड, बातमी24 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी केली आहे. या मोहिमेत एकही कुटूंब सुटणार नाही याची दक्षता प्रत्येक संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नांदेड जिल्ह्यातील ही मोहिम अधिक प्रभावीपणे यशस्वी करू, असा […]

आणखी वाचा..