यापुढे शनिवारी सुद्धा शटर उघडे राहणार

नांदेड, बातमी24:– प्रती शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची होणारी गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या उशिरा का होईना लक्षात आले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक शनिवारी सुद्धा सकाळी नऊ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने ही अटी व शर्तींच्या अधिन राहून चालू ठेवता येणार आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले. नांदेड जिल्ह्यात शनिवार […]

आणखी वाचा..

तपासण्या कमी झाल्याने रुग्णसंख्येत घट

नांदेड,बातमी24:- ज्या दिवशी कोरोनाच्या तपासण्या कमी होतात,त्या दिवशी रुग्णसंख्येत घट होत असते,आणि ज्या दिवशी तपासण्या वाढतात,त्या दिवशी मात्र  रुग्णसंख्या  संख्येत वाढ होते,सोमवार तपासण्या कमी झाल्याने रुग्ण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या  81 झाली आहे. सोमवार दि. 17 रोजी 436 नमुने तपासण्यात आले.यात 344 अहवाल निगेटिव्ह 81 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर […]

आणखी वाचा..

नांदेडचे पहिले खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांच्या पत्नीचे निधन

नांदेड, बातमी24ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेडयुल्ड कास्ट ऑफ फे डरेशनचे पक्षाचे नांदेडचे पहिले खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांच्या सुविद्य पत्नी तथा हदगाव नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा श्रीमती अंजनाबाई हरिहरराव सोनुले यांचे वृद्धपकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. सन 1951 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्व. हरिहरराव सोनुले हे शेडयुल्ड कास्ट ऑफ […]

आणखी वाचा..

शनिवारी लॉकडाऊन शिथिलता मिळणार काय?नागरिकांचे लक्ष

नांदेड,बातमी24ः मागच्या सहा महिन्यांपासून सगळे धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द झालेले आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थी दिनी श्री स्थापना होत असते. त्या दिवशी शनिवार आहे. नांदेड जिल्ह्यात शनिवार व रविवार लॉकडाऊन पाळला जातो. त्यामुळे श्री स्थापने दिनी अर्थात शनिवारी लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा […]

आणखी वाचा..

गंभीर रुग्णांच्या संख्या जवळपास दोनशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची रविवारी 95 झाली. 102 जणांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला, तर गंभीर रुग्णांची संख्या 193 एवढी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 478 अहवाल तपासण्यात आले.360 निगेटीव्ह आले, तर 95 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. यात आरटी-पीसीआर चाचणीत 54 तर अंटीजनमध्ये 41 जण पॉझिटीव्ह आले. त्यामुळे […]

आणखी वाचा..

महापुरुषांचे पुतळे सामाजिक एकोप्याचे प्रतिकः अशोक चव्हाण

नांदेड, बातमीः संत-महंत व महापुरुषांच्या कार्यातून समाजाची उभारणी व जगण्याचा मार्ग माणसाला मिळाला. त्यामुळे प्रत्येकासाठी आदर्श ठरणार्‍या प्रत्येक महापुरुषांचा पुतळा उभारण्याचे महानगर पालिका हद्दीत झाले. हे महापुरुषांच पुतळे महानगरातील सामाजिक एकोप्याचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री यांनी केले. कौठा भागातील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुद पुतळयाचे भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत होते. कौठा भागातील आयजी ऑफिससमोरील […]

आणखी वाचा..

वीस वर्षांच्या तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू;गंभीर रुग्णांची संख्या होतेय गंभीर

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात बघत-बघत कोरोनाच्या रुग्णंसंख्येने चार हजार रुग्णांचा टप्पा स्वातंत्र दिनाच्या मुहर्तावर साध्य केला आहे. या सगळया चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंतेचा भाग बनत चालली आहे. यात एका वीस वर्षांच्या तरुणीचा कोरेानाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात 1 हजार 769 जणांची चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 565 जणांचे अहवाल निगेटीव्ह […]

आणखी वाचा..

महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळयाचे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन -संतोष पांडागळे

नांदेड,बातमी24ः- मागच्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या कौठा येथील नियोजित महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळयाच्या कामाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या पुतळयाचे भूमिपूजन शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी भूमिपुजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली. कवठा येथे महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा […]

आणखी वाचा..

सहा जणांचा मृत्यू; रुग्णसंख्या शतकपार

नांदेड,बातमी24;- नांदेड जिल्ह्यात तीन ते चार दिवसांनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार केले,असून 116 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर सहा जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवार दि. 14 आगस्ट रोजी 840 जणांची तपासणी करण्यात आली. यात 700 अहवाल निगेटिव्ह तर 116 जण पॉझिटिव्ह आले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 50 व अटीजन चाचणीत 66 जण समावेशीत […]

आणखी वाचा..

पोळ्याच्या उत्सवावर कोरोनाचे संकट; मिरवणुकावर बंदी

  नांदेड,बातमी24:- मागच्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गाने लावलेली घरघर मिटण्याचे नाव घेत नाही. अलिकडच्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणावर कोरोनाचे सावट गडद झाले,असून बैलपोळ्याच्या मिरवणुकावर बंदी असणार आहे. मागच्या सहा महिन्यांच्या काळात एकही उत्सव साजरा झालेला नसून पुढील काळातील गणेश उत्सव,दुर्गा उत्सव तसेच दहीहंडी हे सण व उत्सव घरच्या घरी […]

आणखी वाचा..