वैद्यकिय महाविद्यालयात 150 खाटांच्या बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
नांदेड,बातमी24 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीपासून प्रत्येक टप्प्याचा मी साक्षीदार राहिलो आहे. आपल्या भागातील गोर-गरीबांना चांगल्या वैद्यकिय सुविधा इथेच उपलब्ध व्हाव्यात ही दूरदृष्टी स्व. शंकरराव चव्हाण यांनी ठेवली होती. त्यातूनच विष्णुपुरी येथील 112 एकर जागेवर हे महाविद्यालय आणि रुग्णालय साकारले. राज्यातील एक आदर्श वैद्यकिय सेवा-सुविधेचे केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते. कोविड-19 सारख्या […]