खासदार म्हणून मलाही लाज वाटावी, अशी परिस्थिती;चिखलीकर झाले व्यथित

नांदेड, बातमी24ः डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थिती पाहून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्काच बसला, ही परिस्थिती पाहून खासदार म्हणून मला ही लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे, सगळा सावळा गोंधळ व्यथित करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सरकारची सुद्धा खरडपट्टी काढली. डॉ. शंकरराव चव्हाण […]

आणखी वाचा..

खासदार हेमंत पाटील यांची महत्वाच्या समितीवर वर्णी

नांदेड, बातमी24ः- हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्यशासनाने अभ्यास समिती गठीत केली आहे. या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यशासनने 22 जुलै रोजी बैठक आयोजित करून अभ्यास समिती गठीत […]

आणखी वाचा..

वादग्रस्त दिलीप स्वामी जि.प. सीईओपदासाठी उत्सुक!

नांदेड,बातमी24ः नांदेड येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना एका तलाठी महिलेशी असभ्य वर्तणुक केल्या प्रकारावरून दलित समाजातून दिलीप स्वामी व तहसीलदार डापकर यांच्याविरुद्ध असंतोषाची लाट उसळली होती. अशा घृणास्पद प्रकार केल्यानंतरही दिलीप स्वामी नांदेड जिल्हापरिषदेचे सीईओ म्हणून येण्यास उत्सुक दिसत आहेत. अशा अधिकार्‍यास जि.प. सीईओ म्हणून पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यात बोलविणार काय? याकडे लक्ष असणार […]

आणखी वाचा..

नांदेड जि.प. सीईओ होण्यासाठी शिवानंद टाकसाळे यांची प्रतिष्ठापणाला

नांदेड, बातमी24ः नुकतेच आयएएस मानांकन मिळालेल्या सनदी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी स्वतःची पद, प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील आमदारांचे पाठबळ ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यासंबंधी सर्वस्वी निर्णय हा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा असणार असून, ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य […]

आणखी वाचा..

जिल्हयातील दोन अधिकार्‍यांसह 21 जणांना मिळाले आयएएस मानांकन

मुंबई, बातमी24ः बहुप्रतिक्षीत असलेल्या अधिकार्‍यांच्या आयएएस मानांकनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला, असून राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी केडरच्या अधिकार्‍यांना आयएएस मानांकन बहाल करण्यात आले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दोन अधिकार्‍यांचा सुद्धा समावेश आहे. 23 अधिकार्‍यांना मानांकनासंबंधी दोन वर्षांपासून हलचाली सुरु होत्या. शासन दरबारी प्रश्न रेंगाळत पडला होता. यातील काही अधिकार्‍यांनी दाद मिळावी, यासाठी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा […]

आणखी वाचा..

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

  नांदेड,बातमी24:- लिंगायत समाजाचे धर्मगुरू तथा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी मंगळवार दि.1 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार अशी अफवा उठली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यानंतर महाराज यांना चार ते पाच दिवसांपूर्वी नांदेड येथील नारायणा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. […]

आणखी वाचा..

कोरोनाबाधित जिल्हाधिकार्‍यांचा आदर्श पालकमंत्री-खासदारांनी घेण्याजोग्य

नांदेड, बातमी24ः मागच्या सहा महिन्यांपासून कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा म्हणून फ्रं टलाईनवर लढणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे अखेर सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आले. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी पालकमंत्री, खासदार व इतर आमदारांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार न घेता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीची प्रसूती सुद्धा शासकीय रुग्णालयात झाली होती. नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

बापरे अकरा मृत्यू;दोनशेहून अधिक गंभीर:रुग्णसंख्या जवळपास तिनशे

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गाने मागच्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 206 जण मृत्यूशी झुंज देत आहेत,तर रुग्णसंख्या 290 एवढी झाली आहे. सोमवार दि.31 रोजी 1 हजार 328 जणांची चाचणी करण्यात आली. 959 अहवाल निगेटिव्ह तर 290 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 83 व अटीजनमध्ये 207 अहवाल आले आहेत.तर इकडे […]

आणखी वाचा..

तरूण पत्रकार योगेश पाटील यांचे निधन

हिंगोली, बातमी24ः दैनिक सामनाचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते. योगेश पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने औरंगाबाद येथील नंदलाल धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारच्या रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथेच सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. योगेश पाटील यांनी […]

आणखी वाचा..

दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – धनंजय मुंडे

मुंबई, बातमी24ः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे […]

आणखी वाचा..