कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 717 कुटूंबाना विविध योजनांचा लाभ: जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:-कोरोनामूळे जिल्ह्यातील जे व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या कुटूंबातील लहान मुलांची हेळसांड होवू नये या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गंत आजवर जिल्ह्यातील 717 व्यक्तींना विविध योजनाचा लाभ दिला. राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्समार्फत डॉ. इटनकर यांनी  कोरोनामुळे […]

आणखी वाचा..

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सुविधा या बदलत्या काळाच्या गरजांप्रमाणे अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने आवर्जून लक्ष दिले आहे. गावकऱ्यांना पंचक्रोषीतच उत्तम सुविधा मिळाव्यात या दृष्टीने रोहिपिंपळगाव येथे एक कोटी 80 लक्ष रुपयांची नवीन इमारत साकारत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील इमारतीच्या […]

आणखी वाचा..

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मार्गी लावला गंभीर प्रश्न;91 गावांना मोठा दिलासा

नांदेड,बातमी24  :- जिल्ह्यातील काही गावात स्मशानभूमीचा प्रश्न हा भावनिक आणि तितकाच महत्वाचा होता. अनेक खेड्यांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची होणारी विवंचना लक्षात घेवून “गाव तेथे स्मशानभूमी” अंतर्गत जवळपास 91 खेड्यांना शासकीय जागा प्रदानचे आदेश आज काढण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाचा आढावा घेऊन जिल्हा परिषद व महसूल विभागाने समन्वय साधून हा जागेचा विषय […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांचा शिक्षकांना दणका;पाच शिक्षक तडकाफडकी निलंबीत

  नांदेड, बातमी24:- भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस आज शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. सिईओ यांचा भोकर तालुक्‍यात आज दौरा होता. दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट […]

आणखी वाचा..

वादग्रस्त प्र.कार्यकारी अभियंता बारगळचा उदोउदो करणारे तोंडघशी!

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात वादग्रस्त समाज कल्याण अधिकारी राहिलेल्या सुनील खमीतकर यांच्या बेशरम कारभाराला संपूर्ण जिल्हा वैतागला होता.तसेच पाणी पुरवठा विभागात प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर राहिलेल्या बारगळ यांच्या वादग्रस्त कारभाराने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही वैतागलेले असताना जिल्हा परिषद मधील काही पदाधिकारी आणि मोजक्या अधिकाऱ्यांनी बारगळ यांचा केलेला उदोउदो हा त्यांनाच तोंडघशी पडणारा ठरला […]

आणखी वाचा..

भुयारी पुलाखाली साचणारे पाणी ठरतेय डोकेदुखी;आयुक्त लहाने,नगरसेवक गजभारे यांनी केली पाहणी

नांदेड, बातमी24:-पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला,की हिंगोली गेट भुयारी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते,त्यामुळे वाहतूक पुर्णपणे बंद राहते. या हिंगोली गेट येथील भुयारी पुलाची पाहणी मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने व नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केली. यावेळी पाण्याचा निचरा व्हावा,यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावी,अशी मागणी या भागाचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सुनील […]

आणखी वाचा..

डॉ.शंकरराव चव्हाण जयंती निमित्त मधुकर भावे, राजीव खांडेकर यांचे व्याख्यान

नांदेड,बातमी24-भारताचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकार्‍यांचा सत्कार व परिसंवादाचे आयोजन दि.14 जुलै रोजी  करण्यात आले आहे. येथील कुसूम सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार असून मान्यवरांचा सत्कार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात येणार […]

आणखी वाचा..

काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के;नागरिकांनी घाबरू नये:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:- आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मालेगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.तसेच छत्रपती चौक,फरांदे नगर,गोदावरी नगर, मालेगाव रोड, स्नेह नगर पोलीस कॉलनी, हनुमानपेठ (वजीराबाद) मध्ये सौम्य […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकरी डॉ.इटनकर केली शेतात पेरणी;टिपिकल शेतकरी लूक

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- आपल्या ध्येय धोरणावर निश्चित राहून लोक सेवेत सतत कार्यमग्न राहणारे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाचे संकट कमी होताच डॉ.इटनकर यांनी खरिपाकडे मोर्चा वळविला,त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आणि शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी डॉ.इटनकर हे शेतीवर पोहचले, तेही चक्क अगदी शेतकरी वेशभूष करून होय.यावेळी त्यांनी […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार;मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

  नांदेड,बातमी24:-पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाडा विभागाची तूट भरून काढण्याची योजना कालबद्धपणे पूर्ण निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थास्थानी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, […]

आणखी वाचा..