गोदावरीबाबत खुलासा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा;मयताच्या नातेवाईक गोधळ घातल्याने ती चूक

  नांदेड, बातमी24:-तीन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या मयतावर उपचार करण्याचे नाटक म्हणजे पैसे उकळण्याचा प्रकार होता, या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने गोदावरी रुग्णालयावर गुन्हा नोंद झाला.या प्रकरणी आय एम ए ही संघटना धावून आली खरी, मात्र खुलासा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार समोर आला.त्यामुळे संघटनेच्या नैतिकतेवरच या निमीत्ताने प्रश्नचिन्ह लागत आहेत. कोरोनाचा संसर्ग […]

आणखी वाचा..

20 मे साठी केंद्रनिहाय लसीचा पुरवठा जाहीर:-डीएचओ डॉ.शिंदे यांची माहिती

नांदेड,बातमी24:- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन डीएचओ डॉ.शिंदे यांनी केले   दिनांक 20 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या […]

आणखी वाचा..

राज्यात खळबळ उडालेल्या प्रकरणात त्वरित अहवाल सादर करा: – जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नांदेड,बातमी24:- तीन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या मयतावर केवळ पैसे काढून घेण्यासाठी उपचार करत असल्याचे भासवून प्रेताची विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.या प्रकरणाचे वृत्त ‘बातमी24.कॉम’ने समोर आणताच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मागच्या महिन्यात 16 एप्रिल रोजी अंकलेश पवार यांना कोरोनावर […]

आणखी वाचा..

भोसी पॅटर्न ग्रामीण भागास कोरोनामुक्तीसाठी फलदायी:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- कोरोनामुक्‍तीसाठी भोकर तालुक्‍यातील भोसी गावाने राबविलेल्‍या पॅटर्नमधून 119 कोरोना बाधित रुग्‍ण पंधरा दिवसानंतर कोरोनामुक्‍त झाले आहेत. हा पॅर्टन जिल्‍हयात राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. काल बुधवार दिनांक 12 मे रोजी भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रातंर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकिय […]

आणखी वाचा..

लसीकरणबाबत जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी दिल्या नवीन सूचना

  नांदेड,बातमी24:- प्रत्येक नागरिकांना कोविन लस मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आपल्याला कल्पना असेलच की हे लसीकरण सुलभ व्हावे यादृष्टीने मतदानासाठी जसे बूथ निहाय नियोजन केले जाते तसेच आपण लसीकरणासाठी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली आहे. पहिल्या व दुसऱ्या लसीमध्ये किमान व अधिकाधिक किती दिवस लसीकरण नागरिकांच्या आरोग्यासाठी हितकारक राहील या […]

आणखी वाचा..

उधाच्या लसीकरणबाबत डिएचओ डॉ.शिंदे यांची महत्वाची सूचना; नागरिकांनी लक्ष द्यावे

नांदेड,,बातमी24:- जिल्ह्यात लसीचा तुटवडा असला,तरी आवश्यकतेप्रमाणे नागरिकांना पहिला असो,की दुसरा तसेेच आठरा ते 45 वयोगट अशा पात्र लाभार्थी नागरिकांना उपलब्द्ध्धतेनुसार लस दिली जात आहे. गुरुवार दि.13 रोजी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे,त्यामुळे 45 वर्षांवरील किंवा 18 ते 45 आतील पहिला लस घेऊ इच्छुक नागरिकांनी केंद्रावर अनावश्यक गर्दी क रू नये असे आवाहन […]

आणखी वाचा..

जीवाची पर्वा न करता सेवा करणे मोठ धाडस:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:-आजच्‍या घडीलाही कोरोना सारख्‍या महाभयंकर संकट काळात परिचारिकांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची ठरत आहे. कुटूंब, मुलं व प्रसंगी आपल्‍या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून अत्‍यंत चोखपणे त्‍या सेवा बजावत आहेत. वैद्यकिय क्षेत्रात परिचारिका म्‍हणून त्‍यांचे योगदान अमूल्‍य असल्याचे प्रतिपादन सीईओ वर्षा ठाकूर यांनी केले.जगभरात दिनांक 12 मे रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन […]

आणखी वाचा..

89 केंद्राच्या माध्यमातून 3 लाख 72 हजार जणांचे लसीकरण:जिल्हाधिकारी

नांदेड,बातमी24:-  लसीकरणासाठी जनजागृतीनंतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी पुढे सरसावले आहेत. यात युवा वर्गाचाही मोठा उत्साह दिसून येत आहे. गरजेप्रमाणे जिल्ह्यात लसीकरणाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात असून येत्या काही दिवसात लसीचा पुरवठा सुरळीत होईल असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले. दिनांक 11 मे अखेरपर्यत नांदेड जिल्ह्याला कोविशिल्ड 3 लाख 23 […]

आणखी वाचा..

छुपा कारभार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनपाचा झटका

नांदेड,बातमी 24:- कोरोना नियमावली चे पालन करण्याच्या सुचना प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आल्या ,परंतु दुकाने उघडण्याची परवानगी नसताना व दिलेल्या वेळेत दुकानें बंद न केल्याने आज दि.8 मे रोजी शनिवारी महापालिका व पोलीस प्रशासनाने जुना नांदेड भागातील बरकी चौक,मणीयार गल्ली,जुने गंज भागातील सात दुकानें बंद करून दंडात्मक कारवाई केली. आजची कारवाई मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने […]

आणखी वाचा..

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्‍म नियोजन करण्‍याचे सिईओ वर्षा ठाकूर यांचे निर्देश

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्‍या दुस-या लाटेत रुग्‍णांची संख्‍या रोखण्‍यासाठी ग्रामीण भागात सूक्ष्‍म नियोजन करण्‍याच्‍या सूचना नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या आहेत. आज शुक्रवार दिनांक 7 मे जिल्‍ह्यातील सर्व तालुका आरोग्‍य अधिकारी व वैद्यकिय अधिका-यांचा सर्वंकष आढावा त्‍यांनी घेतला. यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागात मागच्‍या वर्षीपासून आयसीडीएस […]

आणखी वाचा..