264 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24: जिल्ह्यात 264 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तर आठ जणांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. आजच्या एकुण 1 हजार 70 अहवालापैकी 751 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 12 हजार 701 एवढी झाली असून यातील 8 हजार 480 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.सध्या 3 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार […]

आणखी वाचा..

आयुर्वेदिक महाविद्यालयात  खाटांची व्यवस्था करा – आ. कल्याणकर

नांदेड, बातमी24ः आयुर्वेदिक महाविद्यालयात कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हीड केअर सेंटरची नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली असून वैद्यकीय अधिकार्‍यांना व लवकरात लवकर रुग्णांसाठी नवीन 60 सुसज्य खाटांची व्यवस्था करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजपूत यांना सूचना केल्या. सध्या सर्वत्र कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत […]

आणखी वाचा..

शिक्षण सभापती बेळगे यांची विविध विषयावर शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण विभागासंबंधी आढावा सादर करून चर्चा केली. संबंधित मागण्या व प्रश्ना संबंधी सकारात्मक विचार करू असे आश्वासन मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण सभापती संजय बेळगे यांना दिला. या वेळी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती. शालेय शिक्षणमंत्री […]

आणखी वाचा..

रंगभरण तसेच चित्रकला स्पर्धेचे 17 रोजी बक्षीस वितरण

  नांदेड,बातमी24:-नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच मिडीया पार्टनर दै. लोकमत व दै.सत्यप्रभाच्या संयुक्त विद्यमाने माजी केद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फेब्रुवारी महिन्यात कुसूम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मराठवाडा मुक्तीदिनाचे औचित्य साधून दि.17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण […]

आणखी वाचा..

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनाला रवाना झाले होते. तिथे ते कोरोना पॉझिटीव्ह आले आहे,असून त्यांच्यावर दिल्ली येथेच उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.यापूर्वी मागच्या महिन्यात खासदार चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी […]

आणखी वाचा..

52 आकोडेबहाद्दर महावितरणच्या जाळ्यात

  नांदेड,बातमी24:- जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने आज वीजचोरांविरोधात मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत लोहा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या तीन गावामधील आकोडा टाकून अनधीकृतपणे वीज वापरणाऱ्या 50 आणि हदगाव उपविभागातील 12 लोकांवरती वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर मोहीम राबवून सोनखेड गावातील 15 तसेच कलंबर येथील […]

आणखी वाचा..

दोन मंत्र्यांच्या पत्राला जिल्हा परिषदेचा दांडा

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सभा ऑनलाइन घेण्याबाबत शासनाचा आदेश काटेकोरपणे पाळला जातो. मात्र त्याच शासनाच्या मत्र्यांचे पत्रांना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न दुसर्‍यांदा झाला आहे.या प्रकरणाची सरकारकडून दखल घेतली जाऊ शकते. पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्याविरोधात जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हा परिषद सदस्यांची सुद्धा तीव्र नाराजी आहे. यात काही पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.परंतु; जिल्हा […]

आणखी वाचा..

अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल

नांदेड,बातमी24:- मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितिचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जवाबदार आहेत. तसेच केंद्र सरकारने सुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्या कारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे […]

आणखी वाचा..

नांदेडच्या आमदाराची पुण्यात नाचक्की

नांदेड, बातमी24ः नांदेडच्या पॉलिटीकल मॅनेजमेंटमध्ये टॉपर असलेले विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांची पुण्यात मास्कवरून नाचक्की झाल्याची समोर आली आहे. संतापलेल्या आमदार राजूरकर यांनी पुणे येथील महापालिका कर्मचारी व पोलिसांची बघून घेतो,अशी धमकीवजा इशारा देत नांदेडकडे रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अमर राजूरकर व त्यांचे तीन सहकारी व चालक पुणे येथील कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये पुन्हा कुख्यात गुंडास पिस्टलसह पकडले

नांदेड, बातमी24ः नांदेडमध्ये गावठी पिस्टल व अवैध हत्याराचे नांदेड शहर हे माहेरघर बनले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या आरोपातील फ रार आरोपीस गावठी पिस्टल तीन काडतुसासह ताब्यात घेतले. ही धाडसी कारवाई पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. मागच्या महिन्यात नांदेड येथे सराईत गुन्हेगार विक्की चव्हाण यांच्या हत्येमधील फ रार असलेला आरोपी प्रदीप श्रीराम श्रावणे […]

आणखी वाचा..