त्या आजारी रुग्णास चिखलीकर यांचा हातभार

  नांदेड,बातमी24: उमरी तालुक्यातील रोहिदास भिमराव पवळे रा.पळसगाव येथील तरुणाची दोन्ही किडणी निकामी झाली. गेल्या वर्षापासून रोहिदास औषोधोपचारासाठी वनवन भटकत आहे. मंगळवारी सकाळी बैलगाडीतून रोहिदासला घेवून त्यांची आई पंचफुलाबाई पवळे व भाऊ पांडूरंग पवळे यांनी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर, नांदेड येथील निवासस्थानी घेवून आले. यावेळी चिखलीकर यांनी मदतीचा हात देत यापुढे रुग्णास नांदेडला […]

आणखी वाचा..

सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ. खंडाळकर यांचे निधन

नांदेड, बातमी24ः नादेड येथील राजनगर येथील रहिवासी तथा यवतमाळ येथील सहाय्यक विक्रीकर सहाय्यक आयुक्त डॉ. शरद खंडाळकर (वय.34) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नांदेड येथील शासकीय आयुवैर्दीक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. शरद खंडाळकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर मजल मारली होती. विशेष म्हणजे, डॉ. खंडाळकर यांची यवतमाळ येथून नांदेड […]

आणखी वाचा..

मृत्यू रोखण्याचे आव्हान ठरतेय जड

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी यात कोरोनामुळे मृत्यू पावत जाणार्‍या रुग्णांची संख्या रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. सरासरी पाच रुग्णांचा मृत्यू होतच आहे.सोमवारी सुद्धा पाच जणांचा मृत्यूची नोंद कोरोनाच्या संसर्गामुळे झाली आहे. यात पंचविस वर्षीय महिलेच्या मृत्यूचा समावेश आहे. मागच्या चौवित तासांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल सोमवार दि. 24 रोजी प्राप्त झाला आहे. […]

आणखी वाचा..

सर्दी-तापीची दहा लाख रुपये किंमतीचा औषधी जप्त

नांदेड, बातमी24ः दहा लाख रुपये किंमतीची अवैधपणे केलेला औषधी साठा केलेली औषधी प्रशासनाने जप्त केला.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सदरचा केलेल्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. मालेगाव रोडवरील प्रेमनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये ताप, सर्दी तसेच मल्टीव्हिटामीन इंजेक्शनचा साठा जमा केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. यावरून अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी धाड मारली, असता सर्दी,तापीची औषधी […]

आणखी वाचा..

वर्षेभराच्या काळात बंदुकीला बंदुकीने उत्तर

नांदेड, बातमी24ः पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना नांदेड येथे येऊन वर्षे झाले आहे. या वर्षेभराच्या काळात मगर यांनी वाढत्या गँगवारचे कंबरडे मोडताना बंदुकीला बंदुकीने उत्तर देण्याचे काम त्यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे मगर यांचा वर्षेभरातील गुंडाविरुद्धचा आलेख चढता राहिला आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या बदलीनंतर विजयकुमार मगर हे बदलीने नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्ण संख्या पाच हजार पार

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या बघता-बघता पाच हजार पार झाली आहे. जिल्ह्यातील 183 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 168 जणांना सुट्टी देण्यात आली. रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी 452 नमूने तपासण्यात आले. यात 351 अहवाल निगेटीव्ह आले तर 89 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 32 तर अंटीजन चाचणीत 57 अहवाल […]

आणखी वाचा..

चार दरवाजे उघडल्याने नदी काठयाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड, बातमी24ः वरच्या धरणातील पावसाची सततधार सुरु असल्याने गोदावरी नदी पात्राचे रात्री आठ वाजेच्या सुमारास चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. विष्णुपुरी जलाशय जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला आहे. अधून-मधून या जलाशयाचे एक किंवा दोन दरवाजे उडण्यात आले […]

आणखी वाचा..

राज ठाकरे यांनी केले इरावार कुटुंबियांचे फ ोन करून सांत्वन

नांदेड, बातमी24; राजकारणात जात व पैसा महत्वाचा असतो. ते दोन्ही माझ्याकडे नाही, असे राजसाहेब मला माफ करा, अशी चिट्टी लिहून रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी मनसेचे किनवट शहर प्रमुख सुनील इरावार यांनी आत्महत्या केली होती. कार्यकर्त्याच्या आत्महत्येची दखल घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मयत इरावार यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत धीर देत सांत्वन केले. सुनील […]

आणखी वाचा..

नांदेडचे पहिले खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांच्या पत्नीचे निधन

नांदेड, बातमी24ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेडयुल्ड कास्ट ऑफ फे डरेशनचे पक्षाचे नांदेडचे पहिले खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांच्या सुविद्य पत्नी तथा हदगाव नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा श्रीमती अंजनाबाई हरिहरराव सोनुले यांचे वृद्धपकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. सन 1951 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्व. हरिहरराव सोनुले हे शेडयुल्ड कास्ट ऑफ […]

आणखी वाचा..

महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळयाचे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन -संतोष पांडागळे

नांदेड,बातमी24ः- मागच्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या कौठा येथील नियोजित महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळयाच्या कामाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या पुतळयाचे भूमिपूजन शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी भूमिपुजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली. कवठा येथे महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा […]

आणखी वाचा..