शंकरअण्णा धोंडगे यांच्याकडून महत्वपूर्ण मागणी

कृषी

नांदेड, बातमी24ः सध्या मूग उडीद हंगाम आला असून अडचणीतल्या शेतकर्‍यांची व्यापार्‍याकडून लूट होऊ शकते, त्यामुळे शासनाने तातडीने मूग, उडीदाची किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी ना. जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांना निवेदन देऊन मूग उडीद या धान्यांना आधारभूत किंमत देऊन राज्य शासनाने तातडीने खरेदी करावी अन्यथा व्यापारी ओलावा व इतर कारणे दाखवत शेतकर्‍यांचीची लूट करू शकतात,ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली.अतिवृष्टी व इतर संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने दिलासा देणे आवश्यक आहे अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली.

शेतकर्‍यांसाठी अण्णा पुन्हा सक्रिय…..

पूर्ण हयातभर शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नासाठी लढणारे शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे मागील काळात सक्रिय राजकारणातून काहीसे अलिप्त असल्या कारणाने चर्चा होत असतानाच ! शेतकर्‍यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत मूग उडीद या धान्यांची आधारभूत किमत देऊन सरकारने खरेदी करावी ही मागणी सरकारला करत त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले.