नांदेड,बातमी24:- अतिवृष्टीने सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे.परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी लक्षात घेता शासनाकडून पीक विमा कंपन्यांना तशी ताकीद देण्यात आलेली आहे. शेतात झालेल्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीना तात्काळ वेळेत दिली जावी,यासाठी ई. पिकपाहणी अँप शासनाने सुरू केले.या अँपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार इतके शेतकरी स्वतःच्या शेतातील हे झालेल्या नुकसानीचा अहवाल अँप च्या द्वारे नोंदविणार आहेत. याबाबत महसूल यंत्रणा व कृषि कार्यालय व विभागाची यंत्रणांना तशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा झालेले पंचनामा करायचा झाला तर यंत्रणा कमी पडू शकते.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ई. पीक पाहणी अँप शासनाने सुरू केले आहे. गत महिनाभरात 1 लाख शेतकऱ्यांनी हे अँप आपल्या मोबाईलवर घेत पीक पहाणी नोंदणी केल्याचे डॉ.इटनकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 1 हजार 556 गावे ऑनलाईनशी जोडले गेले आहेत.यामध्ये एका गावातील किमान 200 या प्रमाणे 2 लाख 10 हजार 921शेतकऱ्यांची नोंदणी ई पीक पाहणी अँप द्वारे नोंदविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले. त्यानुसार आज आणि उधा या मोहिमेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी केली जात,असून अप बदल माहिती दिली जात आहे.
सोळा तालुक्यातील 1 हजार 555 गावामध्ये प्रति गाव दहा याप्रमाणे 15 हजार 560 स्वयंसेवक मार्फत एका स्वयंसेवकाकडे 20 शेतकरी अशी जबाबदारी असेल. 3 लाख 11 हजार 200 असे शेतकरी यांच्याकडून पीक पाहणीचे उद्दिष्ट्य साध्य होऊ शकते. मात्र यांपैकी किमान 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी होईल असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कळविले आहे.याबाबत गावनिहाय जनजागृती करण्याच्या सूचना गाव पातळीवरील संबंधिताना देण्यात आल्याचे डॉ.इटनकर यांनी कळविले.